दुकान फोडून ५७ हजाराचा ऐवज लंपास (फोटो- istockphoto)
दौंड: दौंड शहराच्या बाजारपेठेतील एक मोबाइल विक्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ५७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला . तर भरचौकातील अन्य एका गॅस एजन्सी दुकानाचे शटरच्या कुलूप लावण्याच्या दोन कड्या अवघ्या १६० सेकंदात तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता.
याबाबात अधिक माहिती अशी की , दौंड शहरातील दौंड – सिध्दटेक अष्टविनायक मार्गावर भंगाळे हॉस्पिटल समोरील श्री गणेश मोबाइल शॉपी येथे काल दि. २० रोजी मध्यरात्री चोरी झाली.चोरट्यांनी शटर उचकटून दुकानातील दोन नवीन व दोन जुने मोबाइल हॅण्डसेट व रोख ३४ हजार रूपये, असा एकूण ५७ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत दुकानाचे मालक नितीन सलामपुरे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.