Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: वाल्मीक कराडला 14 दिवसांची CID कोठडी; केज कोर्टाचा मोठा निर्णय

सीआयडीकडून आजच वाल्मीक कराडच्या कोठडीबाबत सुनावणी घ्यावी अशी केज कोर्टाला विनंती करण्यात आली होती. कोर्टाने ही विनंती मान्य केली आणि सुनावणीदरम्यान

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 01, 2025 | 12:13 AM
Big Breaking: वाल्मीक कराडला 14 दिवसांची CID कोठडी; केज कोर्टाचा मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

संतोष देशमुख प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान आज वाल्मीक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर त्याला आणण्यात आले. केज येथे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पोलिसांनी 15 दिवसांच्या कोठडीची मागणी सीआयडीने कोर्टासमोर केली. त्यानंतर झालेल्या सुनावणीत केज कोर्टाने वाल्मीक कराडला कोठडी सुनावली आहे.

केज कोर्टात हजर करण्यापूर्वी वाल्मीक कराड याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कोर्टसमोर हजर करण्यात आले. त्यावेळेस पोलिसांकडून कोर्टाला वाल्मीक कराडला 15 दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले याचा शोध घेण्यासाठी वाल्मीक कराड यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी कोर्टासमोर सांगितले.  सरकारी वकील आणि वाल्मीक कराड यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाल्याचे पाहायला मिळाले.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद 

कोर्टात झालेल्या युक्तीवादामध्ये सीआयडीने संतोष देशमुख हत्या आणि खंडणी मागीतल्याचे परस्पर संबंध आहे .  तसेच वाल्मीक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे. आरोपी सुदर्शन घुले वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. वाल्मीक कराडच्या कोठडीशिवाय सुदर्शन घुलेकहा शोध घेणे अशक्य आहे. त्यासाठी वाल्मीक कराडला 15 दिवसांची कोठडी द्यावी. सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी कोठडी द्यावी.

वाल्मीक कराडच्या वकिलांचा युक्तीवाद. 

वाल्मीक कराडच्या वकिलांनी युक्तीवाद करताना त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणात आरोप आहेत. वाल्मीक कराड हा एक सामाजिक कार्यक्रता आणि गरीब राजकारणी असल्याचे सांगितले. तर वाल्मीक कराडला जाणूनबुजून अडकवण्यात येत असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. खंडणीचा आरोप आहे म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. आवाजचे नमुने देण्यास तयार आहोत मात्र कोठडी नको. वाल्मीक कराड स्वतः शरण आले आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. 308 कलम हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले. मिडिया ट्रायल पाहून निर्णय देण्यात येऊ नये.

हेही वाचा: Santosh Deshmukh News: वाल्मीक कराडच्या सरेंडरवर फडणवीस स्पष्टच बोलले; ” सर्व आरोपींना फाशी…”

वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे. वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले.

हेही वाचा: Walmik Karad : CID चे अधिकारी सारंग आव्हाड यांनी वाल्मिक कराडविषयी दिली मोठी माहिती; म्हणाले, ‘फरार आरोपी…’

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

कोणालाही खंडणी मागता येणार नाही. आम्ही अत्यंत वेगाने तपास केला आहे. त्यामुळेच वाल्मीक कराड शरण आला आहे. हत्ये करणारे जे फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी अनेक पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत. कुठलाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढू. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून त्यांना फाशी होत नाही तोवर ही कारवाई थांबणार नाही, असे आश्वासन मी धनंजय देशमुख यांना दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण जाणीवपूर्वक सीआयडीकडे देण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना पूर्णपणे  मोकळीक देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दवाब खवपून घेणार नाही

Web Title: Kej court issued 14 days cid custody to valmik karad on extortion and santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 12:13 AM

Topics:  

  • Beed crime News
  • Santosh Deshmukh Murder
  • Valmik karad

संबंधित बातम्या

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
1

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
2

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण
3

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Beed Crime: परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष, पोलिसांनी तीन नराधमांना केले अटक
4

Beed Crime: परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष, पोलिसांनी तीन नराधमांना केले अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.