Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: वीज गेली अन् ऑनलाइन परीक्षेचा बोजवारा! प्रवेशपूर्व परीक्षेत गोंधळ; परीक्षार्थी संतप्त, पोलिसांना पाचारण

भंडाऱ्यात शासकीय स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाइन पेपरदरम्यान दोनदा वीज खंडित झाल्याने मोठा गोंधळ उडाला. काहींचे लॉगिन झाले, काहींना परीक्षा सुरूच करता आली नाही; पेपर पुन्हा घेण्याची मागणी करत परीक्षार्थींनी केंद्राबाहेर गर्दी केली आणि पोलिसांना बोलवावे लागले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 23, 2026 | 07:20 PM
Bhandara News: वीज गेली अन् ऑनलाइन परीक्षेचा बोजवारा! प्रवेशपूर्व परीक्षेत गोंधळ; परीक्षार्थी संतप्त, पोलिसांना पाचारण
Follow Us
Follow Us:
  • अचानक वीज खंडित झाल्याने 125 परीक्षार्थींच्या ऑनलाइन परीक्षेच्या प्रक्रियेत मोठा आणि गंभीर व्यत्यय निर्माण झाला.
  • लॉगिन आणि पेपर सुरू झाल्यानंतर पुन्हा वीज गेल्याने संतप्त परीक्षार्थींनी परीक्षा नव्याने घेण्याची मागणी केली.
  • स्पष्ट निर्णय न मिळाल्याने केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
बार्टी, सारथी व आरटीच्या शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी मंगळवारी, घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व ऑनलाइन परीक्षेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बोजवारा उडाला. भंडारा येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सुमारे १२५ परीक्षार्थी उपस्थित होते. बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू असतानाच वीज गेल्याने काही परीक्षार्थांचे लॉगिन झाले, तर – अनेकांना लॉगिनच करता आले नाही. त्यानंतर ऑनलाइन पेपर सुरू झाल्यानंतर काही प्रश्न सोडविल्यानंतर पुन्हा – वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षार्थीमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

मंगळवारी, सायंकाळी ४.३० ते ६.३० या – वेळेत ही परीक्षा नियोजित होती. परीक्षा – सुरू करण्यापूर्वी परीक्षार्थीची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात येत होती. मात्र, याचदरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सुमारे निम्म्या परीक्षार्थीचे बायोमेट्रिक पूर्ण झाले, तर उर्वरित परीक्षार्थीना लॉगिन करता आले नाही. दरम्यान, ज्यांचे लॉगिन झाले त्यांनी ऑनलाइन प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात केली.

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २१ वर्षांत ७८१ शेतकरी आत्महत्या! फक्त २ शेतकरी कुटुंबांनाच मदत; तब्बल ४७६ प्रकरणे ठरवली अपात्र

काही परीक्षार्थीनी पाच ते सहा प्रश्न सोडविल्यानंतर सायंकाळी सुमारे ५.५० वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर तब्बल ६.०५ वाजण्याच्या सुमारास वीज आली. परीक्षा केंद्रावर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर केंद्र चालकांनी परीक्षा पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षार्थीनी त्यास तीव्र विरोध केला.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

वीज खंडित झाल्यामुळे परीक्षा प्रक्रियेत मोठा व्यत्यय आला असून, अनेक परीक्षार्थीना निर्धारित वेळेत परीक्षा देता आली नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करून नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली. विशेषतः दूरवरून आलेल्या परीक्षार्थीमध्ये मोठी नाराजी होती. यामध्ये युवतींचीही संख्या होती. परीक्षा लांबल्याने त्यांना परतीच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्र संचालकांनी परीक्षा नंतर घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी लावून धरली. मात्र, यावर तातडीने तोडगा न निघाल्याने परीक्षा केंद्र परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंत परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

स्पर्धा परीक्षांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह शासकीय स्पर्धा परीक्षांच्या आयोजनात वारंवार तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे अडथळे निर्माण होत असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वीही याच परीक्षा केंद्रावर एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील नियोजन, तांत्रिक व्यवस्था आणि पर्यायी विद्युत व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. उशिरापर्यंत परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार, याबाबत परीक्षार्थीना स्पष्ट माहिती मिळाली नसल्याने त्यांची अस्वस्थता कायम होती.

Web Title: Bhandara online exam power cut chaos candidates protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Bhandara

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.