Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Factory Blast: भंडाऱ्यातील स्फोटावरून रंगले राजकारण; CM कडून शोक व्यक्त तर पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 24, 2025 | 03:07 PM
Bhandara Factory Blast: भंडाऱ्यातील स्फोटावरून रंगले राजकारण; CM कडून शोक व्यक्त तर पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Bhandara Factory Blast: भंडाऱ्यातील स्फोटावरून रंगले राजकारण; CM कडून शोक व्यक्त तर पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

भंडारा: भंडारा जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भंडाऱ्यातील  जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये  मोठा स्फोट झाला आहे. कारखान्यातील आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये झालेल्या या स्फोटात ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. तर अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली असून मदतकार्यास सुरूवात झाली आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तर नाना पटोले यांनी टीका केली आहे. त्यामुळे या घटनेवरून राजकारण तर सुरू झाले का? अशी चर्चा सुरू आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील.

भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर…

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 24, 2025

संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

नाना पटोले यांची टीका

भंडाराय येथे कारखान्यात झालेल्या स्फोटावर बोलताना महाराष्ट्र कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

Mumbai | On blast in Ordnance Factory, Bhandara, Maharashtra Congress chief Nana Patole says, "This is the failure of the Modi government." pic.twitter.com/udmHTLCfWg

— ANI (@ANI) January 24, 2025

हा झालेला स्फोट म्हणजे केंद्रातील मोदी सरकारचे अपयश असल्याची टीका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आर. के. सेक्शनमध्ये १४ कामगार कार्यरत होते.  आज सकाळी 11 च्या सुमारास, याच आर.के सेक्शनमध्ये मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की काही क्षणातच संपूर्ण मजला कोसळला.  इमारतीच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली जवळपास 10-12 कामगार अडकल्याची शक्यता आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.  युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे आणि काही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

भंडारा येथील अपघाताबाबत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की,  “मला स्फोटाची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.”

हेही वाचा: Bhandara Factory Blast: भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट; 5 जणांचा मृत्यू

जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचला, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. स्फोटानंतर भीषण आग लागली आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. अनेक स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी हा धुर आणि स्फोट मोबाईलमध्ये टिपला आणि ते चित्रीकरण सोशल मीडियावर शेअर केले. स्फोट साधारणपणे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला, अशी माहिती आहे.

 

Web Title: Politics started at bhandara ordnance factory blast cm fadnavis and nana patole latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Bhandara
  • devendra fadanvis
  • Nana patole

संबंधित बातम्या

संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन
1

संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
2

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
3

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Devendra Fadnavis : पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात राडा; फडणवीस संतापून म्हणाले, “सर्व आमदार माजलेत…”
4

Devendra Fadnavis : पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात राडा; फडणवीस संतापून म्हणाले, “सर्व आमदार माजलेत…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.