Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara Crime: देवदूत की दलाल? उपचाराच्या बहाण्याने १0 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार डॉक्टर फरार

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने 10 दिवसांच्या चिमुकलीची 3 लाख रुपयांत विक्री केल्याचा आरोप आहे. प्रकरणी पाच जणांवर गुन्हा, एक महिला अटकेत तर मुख्य आरोपी फरार आह

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 12, 2026 | 09:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखांत विक्री केल्याचा आरोप
  • डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा दाखल
  • एक महिला अटकेत, इतर आरोपी फरार
  • उपचाराच्या नावाखाली पालकांची फसवणूक
भंडारा-गोंदिया: भंडारा–गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरला आपण देवदूताचा दर्जा दिला आहे, मात्र त्याच डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने अवघ्या 10 दिवसांच्या चिमुकलीची तब्बल 3 लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

कसा उघडकीस आला प्रकार?

भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचे बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच अधिकारी चौकशीसाठी तिथे पोहोचले. मात्र संबंधित महिलेने बाळाला घेऊन तिथून पळ काढला. यामुळे त्या महिलेवर संशय बळावला. पोलिसांनी तातडीने आपली चक्रे फिरवत बाळाला ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केले असता हा सगळा प्रकार गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा असल्याचे समोर आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: सहावीतील विद्यार्थ्यावर चार वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा

३ लाखात बाळाची विक्री

पोलिसांनी तपास केले असता बाळाला ३ लाखात विकल्याचे समोर आले. 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश डॉक्टरच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता.उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिले जाणार होते.

बाळाची विक्री कशी करण्यात आली

गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये एका दाम्पत्यानं आपल्या 10 दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते.डॉ. नितेश बाजपेयी याने उपचाराचा खर्च खूप जास्त होईल, अशी भीती पालकांना घातली. नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत आम्ही मुलीवर मोफत उपचार करू, अशी खोटी बतावणी करून डॉक्टरने पालकांकडून मुलीला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, उपचाराऐवजी या डॉक्टरने भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला या चिमुकलीची 3 लाख रुपयांत विक्री केली.

गुन्हा दाखल

ललेश्वरी सादेपाच या महिलेला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत. पोलीस फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली आहे. बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जण यात आरोपी आहेत याचा तपास पोलीस करत आहे.

गुन्हा दखल करण्यात आलेल्यांची नावे

१) डॉ नितेश बाजपेयी – गोंदिया
२) मालती वाघमारे – पांढराबोडी भंडारा
३) पौर्णिमा धुर्वे – गोंदिया
४) ललेश्वरी सादेपाच – गोंदिया
५) उमेशसिंग गहलोत – गोंदिया

लिफ्टमध्ये बसवलेल्या CCTV मुळे आत्महत्येचे रहस्य उघड होणार, गाझियाबादमधील तीन मुलींच्या मृत्यूतील आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: भंडारा-गोंदिया जिल्ह्यात.

  • Que: आरोप कोणावर आहे?

    Ans: डॉ. नितेश बाजपेयीसह पाच जणांवर.

  • Que: बाळाची विक्री किती रुपयांत झाली?

    Ans: अंदाजे 3 लाख रुपयांत.

Web Title: Bhandara crime angel or broker 10 day old baby sold for rs 3 lakh on the pretext of treatment main mastermind doctor absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.