Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarali Pumped Storage Project: भीमाशंकरच्या जंगलानंतर तारळी खोऱ्यावर अदानीची नजर; शेती अन् पाणी वाचवण्यासाठी स्थानिकांचा एल्गार!

Tarali Pumped Storage Project: तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत ५ हजार ६७५ कोटी रुपये असताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश तेलगू यांनी वन विभागाकडे ही किंमत केवळ ५६.७५ कोटी रुपये असल्याचे कळविल्याचा दावा पाटणकर यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 16, 2026 | 02:05 PM
Tarali Pumped Storage Project, Tarali Project, Satara News, Environment

Tarali Pumped Storage Project, Tarali Project, Satara News, Environment

Follow Us
Follow Us:
  • अदानी समुहाच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला कडाडून विरोध
  • प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत ₹५,६७५ कोटी असताना वन विभागाकडे ₹५६.७५ कोटी दाखल्याचा आरोप
  • सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळणाऱ्या ४ टक्के (सुमारे ₹२२७ कोटी) निधीवर गदा
Tarali Pumped Storage Project: विकासाच्या नावाखाली तारळी खोऱ्यातील शेती, पाणी आणि पर्यावरणाचा बळी दिला जाणार असेल, तर असा विकास आम्हाला मान्य नाही. अदानी कंपनीचा तारळी पंप स्टोरेज प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी घेतला आहे. प्रकल्पाच्या खर्चाबाबत शंभरपट तफावत दाखविल्याचा आरोप करत त्यांनी कंपनीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत ५ हजार ६७५ कोटी रुपये असताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश तेलगू यांनी वन विभागाकडे ही किंमत केवळ ५६.७५ कोटी रुपये असल्याचे कळविल्याचा दावा पाटणकर यांनी केला. राज्य शासनालाही अशाच स्वरूपाची माहिती दिल्याचा त्यांचा आरोप आहे. मानद वन्यजीव वॉर्डन रोहन भाटे (शहा) यांनी ही बाब उघडकीस आणल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याची प्रक्रिया दिल्ली सरकारच्या पातळीवर सुरू झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

Sangli Sugarcane Price: सांगलीत ‘भारती शुगर’कडून प्रतिटन ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर

या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या चार टक्के निधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला देणे अपेक्षित होते. ५ हजार ६७५ कोटींच्या खर्चानुसार ही रक्कम सुमारे २२७ कोटी रुपये होते. मात्र, प्रकल्पाच्या खर्चाबाबतच चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप झाल्याने वन्यजीव संवर्धनासाठी मिळणाऱ्या निधीचे काय होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शेतीच्या पाण्यावर औद्योगिक प्रकल्पाचे सावट

तारळी नदीच्या पाण्यावर स्थानिक शेतकऱ्यांचा हक्क असून, कंपनीच्या पाणी वापरामुळे नदीकाठच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. तारळी कालव्याच्या माध्यमातून कराड, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांतील शेतीला मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो. उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे औद्योगिक प्रकल्पासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी, असा संघर्ष भविष्यात उभा राहणार असल्याचे पाटणकर यांनी म्हटले आहे.

Uran Fire News: उरणमध्ये केमिकलच्या गोदामाला भीषण आग; मोठ्या स्फोटाने परिसर हादरला, धुराचे प्रचंड लोट!

प्रकल्पासाठी जमिनी विकण्याकरिता एजंटांमार्फत ग्रामस्थांवर दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी आरोप केले. जमीन देण्यास नकार देणाऱ्या नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याने परिसरात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि बॅटरी स्टोरेजसारखे पर्याय उपलब्ध असताना जंगल, वन्यजीव आणि स्थानिक जनजीवन धोक्यात घालणारे प्रकल्प कशासाठी, असा सवाल करत पाटणकर यांनी तारळी प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी केली. कंपनीवर केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर प्रकल्पच बंद करून अदानी कंपनीला माघारी पाठवले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: डॉ. भारत पाटणकर यांनी तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला का विरोध केला आहे?

    Ans: तारळी खोऱ्यातील शेती, पाणी आणि पर्यावरणाचे नुकसान करून हा प्रकल्प राबवला जात असल्याचा दावा करत तसेच प्रकल्पाच्या खर्चात शंभरपट तफावत दाखवल्याचा आरोप करत डॉ. भारत पाटणकर यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.

  • Que: प्रकल्पाच्या खर्चाबाबत नेमका काय आरोप करण्यात आला आहे?

    Ans: डॉ. पाटणकर यांच्या दाव्यानुसार, प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत ५ हजार ६७५ कोटी रुपये असताना कंपनीने वन विभाग आणि राज्य शासनाकडे ही किंमत केवळ ५६.७५ कोटी रुपये असल्याचे कळवले आहे.

  • Que: या तफावतीचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पावर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: नियमानुसार प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या चार टक्के (सुमारे २२७ कोटी रुपये) निधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, प्रकल्पाची किंमत कमी दाखवल्यामुळे वन्यजीव संवर्धनासाठी मिळणाऱ्या निधीचे काय होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Bharat patankar opposes tarali pumped storage project cost discrepancy allegation as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • environment
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara CJP Protest:साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी
1

Satara CJP Protest:साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची मागणी

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा
2

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा

Satara District Bank Election:  सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार : जयकुमार गोरे
3

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेचा अध्यक्ष मुख्यमंत्रीच ठरवणार : जयकुमार गोरे

Satara News: दिवाळीत अंबवडे गावात उभारले जातात ५० हून अधिक गड-किल्ले; १५ वर्षांपासून ऐतिहासिक परंपरा सुरू
4

Satara News: दिवाळीत अंबवडे गावात उभारले जातात ५० हून अधिक गड-किल्ले; १५ वर्षांपासून ऐतिहासिक परंपरा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.