Sangli Sugarcane Price: सांगलीत ‘भारती शुगर’कडून प्रतिटन ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर
ऊस गाळप हंगाम सुरू होत असताना पहिली उचल किती मिळणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराच्या तुलनेत सांगलीतील कारखानदार कोणती भूमिका घेतात, याबाबतही उत्सुकता होती. अशा परिस्थितीत भारती शुगरने ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर करत आघाडी घेतली आहे.
विशेष म्हणजे, साखरेचे दर समाधानकारक राहिल्यास हंगामापूर्वी ठरलेल्या पहिल्या उचलीव्यतिरिक्त आणखी २०० रुपये प्रतिटन देण्याची तयारीही कारखान्याने दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी कारखानदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनीही दराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारती शुगरची घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेले दर आणि सांगलीतील साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता अन्य कारखानदार आता काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. भारती शुगरने जाहीर केलेल्या दराचा किती कारखानदार आदर्श घेतात आणि ऊसदराची स्पर्धा सुरू होते का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
Satara CJP Protest: साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची
भारती शुगरने ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्याने जिल्ह्यातील अन्य कारखानदारांसमोर दर जाहीर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, ऊसदराच्या मुद्द्यावर आता केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष निर्णयांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Ans: सांगली जिल्ह्यातील 'भारती शुगर' कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३,८०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे.
Ans: कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी स्पष्ट केले आहे की, बाजारपेठेत साखरेचे दर समाधानकारक राहिल्यास पहिल्या उचलीव्यतिरिक्त प्रतिटन आणखी २०० रुपये जादा दर दिला जाईल.
Ans: भारती शुगरने ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली असून, आता इतर साखर कारखान्यांवरही तातडीने दर जाहीर करण्यासाठी दबाव वाढला आहे.






