कोल्हापुरातील कॉंग्रेसच्या विद्यमान आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता येत्या 15 ऑगस्टनंतर नांदेड जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यातील दोन बडे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली आहे. त्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे 15 ऑगस्टनंतर नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेते 11 ऑगस्ट रोजी नांदेडला येत असून, त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसची व्यापक बैठक होणार आहे. बैठकीला प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती राहणार आहे. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असून, विविध निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील भोकर वगळता अन्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा कल राहील, असा अंदाज काँग्रेस नेत्यांचा असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष नांदेडकडे लागले आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या गृह जिल्ह्यात बैठक घेऊन त्यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा झालेल्या पराभवानंतर जिल्ह्यातील अडगळीत पडलेले बरेचसे नेते पुन्हा अॅक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहेत.
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरीही…
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरीही आम्ही काही कमी पडलो नाहीत, वसंतराव चव्हाण यांच्या विजयाने हे दाखवून दिले असून, काँग्रेस पक्ष नेतत्वालाही याची खात्री पटली आहे. त्यामुळे सर्व शक्ती आता नांदेडकडे लावण्याचे काँग्रेसच्या नेतृत्वाने ठरवले आहे.
खतगावकर, चिखलीकर यांची अधिवेशनाला दांडी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहर, जिल्ह्यात मेळावे घेण्यात येत आहेत. रविवारी भोकर येथे झालेल्या मेळाव्यास माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनुपस्थिती होती. सोमवारी नांदेड येथे झालेल्या मेळाव्याही चिखलीकर यांची अनुपस्थिती सर्वांच्या भुवया उंचावणारी ठरली.