
Bhayander news
या अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांची ओळख रघुनाथ भक्तबल्लव दास (वय ३८, मूळगाव जाजपूर, ओडिशा) आणि कला महिंदर सिंग (वय ४५, मूळगाव जालंधर, पंजाब) अशी झाली आहे. अपघातानंतर दोघांचे मृतदेह भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना डीबी रिअॅल्टीच्या मालकीच्या २४८ एकर क्षेत्रात घडली असून, सध्या हे क्षेत्र ‘मिरा रिअल इस्टेट कंपनी’ या नावाने कार्यरत आहे. यातील सुमारे १४८ एकर जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कास्टिंग यार्डसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. या भाडेकरारासाठी बीएमसीकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर रक्कम दिली जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या परिसरावर यापूर्वी पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत आक्षेप नोंदवण्यात आले होते. या जमिनीचा काही भाग किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRZ) आणि बफर झोनमध्ये येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर माती टाकून भराव केल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या प्रकरणी ‘मिरा रिअल इस्टेट डेव्हलपर्स’ विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोस्टल रोड प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपनीकडून सुरू असून, या दुर्घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा उपाययोजना, उपकरणांची गुणवत्ता आणि देखभाल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली असून, प्लॅटफॉर्म कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. तांत्रिक बिघाड, देखभालीतील त्रुटी किंवा निष्काळजीपणा यापैकी नेमके कारण काय, याचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपासानुसार संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.