मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.नया नगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्याआधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश आले आणि काही तासांतच त्याला अटक करण्यात आली.
Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जैब जुबैर अन्सारी (रहिवासी – कुर्ला, मुंबई) असे आहे. तो सध्या मीरा रोड परिसरात एकटाच राहत होता. प्राथमिक माहितीनुसार, तो ऑनलाइन केमिस्ट्री शिकवण्याचे काम करत असल्याचेही समोर आले आहे.
या घटनेची गंभीरता लक्षात घेता प्रकरणाचा तपास आता राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीची मानसिक स्थिती, सामाजिक वर्तन तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा सखोल तपास केला जात आहे.दरम्यान, पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.सध्या सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे—हा हल्ला केवळ एक वैयक्तिक वा गुन्हेगारी वादाचा परिणाम आहे, की त्यामागे कोणता मोठा कट दडलेला आहे? याचे उत्तर तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.
Vasai Accident: वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर नागरिकांचा संताप






