Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bheema Patas Sugar Factory: भीमा पाटसवर साखर वाहतूक पूर्ण ठप्प!; शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा

Bheema Patas Sugar Factory: शेतकरी संघटनेचे स्थानिक नेते शिवाजीराव नांदखिले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर २०२६) भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केले:

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2026 | 04:30 PM
Bheema Patas, Shetkari Sanghatana, Raghunathdada Patil, Daund News,

Bheema Patas, Shetkari Sanghatana, Raghunathdada Patil, Daund News,

Follow Us
Follow Us:
  • शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर भीमा पाटस कारखान्याची साखर वाहतूक ठप्प
  • शेतीसाठीची पाणी उपसाबंदी उठवणे आणि उसाला प्रतिटन ७,५०० रुपये दराची मुख्य मागणी
  • शिवाजीराव नांदखिले यांच्या नेतृत्वाखाली भीमा पाटस कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन
Bheema Patas Sugar Factory News:  शेतीसाठी केलेली पाणी उपसाबंदी तात्काळ उठवणे, उसाला प्रतिटन ७,५०० रुपये दर देणे, साखरेची विक्री ७० ते ८० रुपये प्रति किलोने करणे आणि दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट रद्द करणे, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेने पुकारलेल्या साखर वाहतूक बंद आंदोलनाला वाहतूकदार आणि वाहनचालकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविल्याने भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरील साखर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून साखर पोती भरण्यासाठी आलेली वाहने कारखाना स्थळावर आणि लगतच्या रस्त्यावर जागेवरच उभी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Pune News : भाजपमध्ये मोठी खळबळ! रवींद्र चव्हाण यांची मोठी ऍक्शन! १०० नगरसेवकांना पाठवली ‘कारणे दाखवा’ नोटीस

प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवार, दिनांक १३ रोजी दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी कारखान्यातून साखर घेऊन बाहेर पडणाऱ्या वाहनांना अडवून चालकांना गुलाबपुष्प देण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वाहतूक बंद ठेवण्याची गांधीगिरी मार्गाने विनंती करण्यात आली. या आवाहनाला प्रतिसाद देत वाहनचालकांनी वाहतूक थांबवल्याने कारखान्याच्या आवारात वाहने जागच्या जागी थांबून राहिली आहेत.

१५ ऑक्टोबरचा निर्णय आणि संघटनेचा आक्रमक पवित्रा

एकीकडे राज्य शासन आणि साखर कारखानदारांनी १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे; तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या मान्य झाल्याशिवाय ऊस गाळप आणि साखरेची वाहतूक सुरू होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला ७,५०० रुपये दर मिळालाच पाहिजे, साखर ७० ते ८० रुपये किलोने विकली जावी आणि जर कारखानदारांना हा दर देणे शक्य नसेल तर दोन कारखान्यांमधील २५ किलोमीटर अंतराची अट रद्द करून शेतकऱ्यांना हवा तिथे ऊस घालण्याचे स्वातंत्र्य द्यावे, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास एकाही कारखान्यातून साखरेचे पोते बाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशारा नांदखिले यांनी दिला होता.

बालकांच्या कुपोषणाचे अचूक मोजमाप होणार; कुपोषणाचे प्रमाण समजून उपाययोजना होणार सोपी

दौंडसह जिल्ह्यात आंदोलनाची धग

या आंदोलनाचा परिणाम म्हणून दौंडसह पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोदामांतून साखर बाहेर पडणे बंद झाले आहे. भीमा पाटस सहकारी साखर कारखाना सध्या भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या निराणी शुगर्स लि. येथूनही साखरेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कारखान्याचा परिसर आणि अष्टविनायक महामार्गालगत साखर वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 

Web Title: Bheema patas sugar factory transport blocked by shetkari sanghatana as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.