मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२३-२४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणा-या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराची घोषणा शुक्रवार, दि. २१ रोजी करण्यात आली. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे होणार आहे. माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज व खर्च बचत, उत्पादन खर्च नियंत्रण, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेल्या ठेवीच्या पासबुक्स, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कार्ये या सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
Onion farmer: केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द; शेतकऱ्यांना होणार असा फायदा
कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दूरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे प्रभावी धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच ऊस उत्पादक व सभासद वर्गाच्या सहकार्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणे शक्य झाले आहे. यापूर्वीही कारखान्याला देशपातळीवरील १३ आणि राज्यपातळीवरील १५ असे एकूण २८ पुरस्कार मिळाले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना कार्यरत असून, तो माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालवला जातो. स्थापनेपासूनच या कारखान्याचे संचालन वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. पुणे जिल्ह्यात चांगल्या बाजारभावासाठीही हा कारखाना प्रसिद्ध आहे. तसेच, सात वेळा ‘सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार मिळवणारा देशातील एकमेव कारखाना असल्याचा दावा संस्थेच्या वतीने करण्यात येतो.
अर्धवट जळालेल्या नोटा काढताना अग्निशमन दलाची दमछाक…; न्या. यशवंत वर्मा यांच्या घरातील Video Viral
वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, हा पुरस्कार तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, खर्च नियंत्रण, वेळेत दिलेले ऊसबिल, ऊस उत्पादकता, जास्तीत जास्त ऊस गाळप, साखर उतारा, उत्पादन खर्चातील बचत, ठेवींचे व्यवस्थापन, संचित नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, कर्ज उभारणी मर्यादा, उपलब्ध निधी व त्याचा विनियोग, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि सामाजिक बांधिलकी या विविध निकषांच्या आधारे प्रदान केला जातो.