न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; याचिका फेटाळली (Photo Credit- Social Media)
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी पैशांचे घबाड सापडले आहे. वर्मा यांच्या घरामध्ये जळालेल्या नोटांचे अक्षरशः ढीग लागले आहेत. यामध्ये अर्धवट जळालेल्या नोटा दिसत असून त्या काढताना अग्निशमन दलाचे जवान दिसत आहे. या खोलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका खोलीमध्ये पैशांचे ढीग दिसत आहे. यामध्ये मुख्यतः पाचशेच्या सर्व नोटा दिसून येत आहे. नोटांना आग लागली असून यामध्ये सर्व नोटा जवळपास जळून खाक झाल्या आहेत. नोटांच्या ही राख पाहून सोशल मीडियावर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील व्हिडिओमध्ये इतर उपस्थित असलेले लोक हे “महात्मा गांधी में आग लग गयी (महात्मा गांधींना आग लागली),”अशा शब्दांत नोटा जळाल्या असल्याचे सांगत आहेत. याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. लाईव्ह लॉ यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
#BREAKING Video shared by Delhi Police Commissioner regarding the fire at Justice Yashwant Varma’s house, when cash currencies were discovered. pic.twitter.com/FEU50vHwME
— Live Law (@LiveLawIndia) March 22, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी आपल्या संकेतस्थळावर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी बेहिशोबी रोकड सापडल्याच्या आरोपांशी संबंधित अहवाल आणि दस्तऐवज, तसेच छायाचित्रे आणि व्हिडिओ अपलोड केले. शेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांनी पुरवलेले व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत. हे छायाचित्रे आणि व्हिडिओ १४ मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीच्या विझवण्याच्या कारवाईशी संबंधित आहेत, त्या वेळी ते घरी उपस्थित नव्हते.
न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती. मात्र त्यावेळी ते शहराबाहेर होते. न्यायाधीशांच्या पीएसने पीसीआरला बोलवले. यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली पण या दरम्यान पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बंगल्यात नोटांचा मोठा ढीग सापडला. हा ढीग अर्धा जळून राख झाला होता. हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असून हे प्रकरण सध्या देशभरामध्ये चर्चेत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सरन्यायाधीश उपाध्याय यांना दिलेल्या अधिकृत उत्तरात त्यांच्यावर झालेल्या आरोप फेटाळून लावले आहेत. “मी तुम्हाला विनंती करतो की आम्ही खरोखर ज्या जागेत राहतो आणि कुटुंब म्हणून वापरतो त्या ठिकाणाहून कोणतीही रक्कम जप्त झालेली नाही हे तुम्ही लक्षात घ्यावे,” असे वर्मा म्हणाले आहेत. दरम्यान भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केल्यानंतर काही तासांतच हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.