Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलग 5 दिवसांत 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन, राज्य सरकारकडून आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश

राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2024 | 11:32 AM
सलग 5 दिवसांत 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन, राज्य सरकारकडून आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून मतदारसंघामध्ये नागरी विकासकामांचा धडाका सुरू आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये गेल्या 5 दिवसांपासून तब्बल 19 कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून कल्याण पश्चिम मतदारसंघात आणखी 50 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहितीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी भूमीपूजन प्रसंगी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी भरघोस असा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून कल्याण पश्चिम मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत विविध प्रकारच्या नागरी आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा अक्षरशः धडाका सुरू होता. ज्यामध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यापासून ते जलवाहिनीपर्यंतच्या मूलभूत विकासकामांचा समावेश आहे.

वाहतूक पोलिसांसाठी कुलरचे वाटप
सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेतील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कुलरचे वितरण करण्यात आले. त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले.

रौनक सिटी ते कल्याण स्टेशन बससेवा सुरू
कल्याण पश्चिमेतील रौनक सिटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण स्टेशनला जाण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने केडीएमटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या बस सेवेमुळे इथल्या हजारो नागरिकांचा त्रास वाचणार आहे.

जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी
आधारवाडी जेल परिसरातील जलकुंभातून कल्याण पश्चिमेतील जवळपास अर्ध्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. या जलकुंभाच्या दुरुस्तीसाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यामार्फत 60 लाख रुपयांचा निधी देण्यात आला.

नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उपलब्ध करून दिलेल्या निधीबाबत आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, सुनिल वायले, परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी आणि डॉ. धीरज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Bhoomipujan of development works worth 19 crores in 5 consecutive days work orders of another 50 crores from the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 11:32 AM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Government
  • Vishwanath Bhoir

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
2

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ
4

Devendra Fadnavis: ‘अंधत्व मुक्त महाराष्ट्र’च्या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला ‘दृष्टी यज्ञ’च्या माध्यमातून बळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.