Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

संगमेश्वर तालुक्यातील कडवई, धामापूर आणि कोकरे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांसह चिपळूण तालुक्यातील खेर्डी आणि कुटरे जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2024 | 11:23 AM
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील कडवई, धामापूर आणि कोकरे जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्त्यांसह चिपळूण तालुक्यातील खेर्डी आणि कुटरे जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते रमेशभाई कदम, जिल्हाध्यक्ष सुरेश ऊर्फ बारक्याशेठ बने आणि नेते प्रशांत यादव यांनी सर्वांचे स्वागत केले.पक्षाच्या चिपळूणमधील संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करीत ‘शरद पवार साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

शरद कडवई जिल्हा परिषद गटातील प्रवेशकर्त्यांमध्ये बहुसंख्य भाजपमधील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. कडवई जिल्हा परिषद गटातील महेंद्र शंकर कदम, उत्तम अनंत गायकवाड, विलास आनंदा कदम, महेश अमृतराव सावंत, मोहन सखाराम चव्हाण, जगन्नाथ गंगाराम निकम, रविंद्र गं. निकम, यशवंत भुवड, जयवंत पवार, राकेश पवार, महेश अमृत सावंत, अभिजित सुर्वे, प्रितम सावंत, शैलेश सावंत, राहुल गरटे, प्रकाश कवडे, शिवाजी गायकवाड, विलास घाडगे, अनिल निर्मळ, अमर चव्हाण, सुनील मांडवकर, बाळा साईल, वसंत किंजळकर, महेश साईल, कोकरे जिल्हा परिषद गटातील नांदगाव आणि येगाव या गावातील मनोहर साळुंखे, किरण कांबळे, मिलिंद कांबळे, प्रदीप कांबळे, अनिल कांबळे, अनंत सावर्डेकर, प्रफुल्ल कदम, सागर भोरावडे, अशोक जाधव, नितीन जाधव, जितेंद्र जाधव, अजित जाधव, किशोर कांबळे, अंकुश मोहिते, राकेश भुवड, सागर मेणे, विश्वास कदम, गिरीष कदम, दिलीप जाधव, उत्तम जाधव, रोशन भुवड, धामापूर जिल्हा परिषद गटातील बुरंबाडमधील रविंद्र गमरे, सुरेश गमरे, सत्यवान गमरे, रोहित गमरे, महेश गमरे, सिदार्थ पवार, अशोक जाधव, जयंत पवार, खेर्डीतील इलियास चौगुले, इक्बाल चौगुले, मुनव्वर चौगुले, युनूस चौगुले, मुसा चौगुले, रऊफ भेलेकर, युसूफ बेबल, अरबाज चौगुले, अरमान चौगुले, आकीब चौगुले, वसिम चौगुले, आफताब बंदरकर, इम्रान चौगुले, मुख्तार चौगुले, मन्सूर चौगुले, कबीर चौगुले, समद चौगुले, शब्बीर बंदरकर, सिकंदर सकवारे, अल्ताफ चिपळूणकर, फैरोज चौगुले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षवाढीसह आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला.

यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, सतीशअप्पा खेडेकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, राष्ट्रवादीचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष बाबाशेठ साळवी, राष्ट्रवादी चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईस अलवी, उपाध्यक्ष कादीर मुकादम, देवरुखचे शहराध्यक्ष नीलेश भुवड, माजी नगरसेविकास रुख्सार अलवी, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष आसिफ मुकादम, मनोज दळी, एस. आर. पाटील, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, युवकचे शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, दिनेश शिंदे, जनार्दन पवार, ग्रंथालय विभागाच्या प्रांतिक सल्लागार सदस्य मनिषा पवार, शमूनभाई घारे, राष्ट्रवादीचे सचिव श्रीधर शिंदे, अन्वरभाई जबले, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, रेश्मा काझी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देऊन सन्मान

यावेळी रमेशभाई कदम, सुरेशशेठ बने आणि प्रशांत यादव यांच्या हस्ते नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात शमूनभाई घारे (चिपळूण तालुका राष्ट्रवादी खजिनदार), जनार्दन पवार (जिल्हा उपाध्यक्ष), अश्फाक तांबे (जिल्हा उपाध्यक्ष), इलियास चौगुले (अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्ष), सुशांत सुरेश चिपळूणकर (युवक खजिनदार), राहुल नेताजी पवार (युवक तालुका उपाध्यक्ष) यांचा समावेश आहे.

Web Title: Big blow to bjp before lok sabha elections many bjp workers joined ncp loksbha election bjp narendr modi sharad pawar nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election
  • Narendr Modi

संबंधित बातम्या

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
1

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.