लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहितेच्या काळात नियमांचे उलंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. या काळामध्ये ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम सोबत ठेवता येत नाही. जास्त रक्कम घेऊन फिरल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. भरारी पथकाकडून पुणे, नागपूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात भरारी पथकाने ६५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी फॉरच्यूनर गाडीची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर पोलिसांना १३ लाख ९० हजार ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.
पुणे नागरपूरमध्ये पोलिसांकडून कारवाई
पुण्यात भोसरी एमआयडीसीमध्ये पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर शिरूर पोलिसांनी देखील कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एका खासगी वाहनातून ५१ लाख १६ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. यातील ६५ लाख रुपयांची रक्कम कोषागारात ठेवण्यात आली आहे. तर पुढील कारवाई प्राप्तीकर विभागाकडून केली जाणार आहे. भरारी पथकाकडून नागपूरमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात एसएसटी आणि नागपूर ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या पथकाने १० लाख ३५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. एका स्कॉर्पिओ गाडीतून एवढी मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांवर पोलिसांची नजर
लोकसभा निवडणुकीला अवघे दिवस शिल्लक असताना राज्यभरात काही ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला जात आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर निवडणूक अयोग्य सज्ज झाला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर नियंत्रण पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. काही संशयास्पद आढळून आल्यास त्या वाहनांची तपासणी केली जात आहे. पालघर जिल्ह्यातील गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर तीन पथके तैनात करण्यात आली आहेत.