Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितले महत्त्वाचे कारण…….

Politics of Maharashtra

  • By युवराज भगत
Updated On: Sep 21, 2023 | 03:38 PM
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मोठी अपडेट; राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, संजय शिरसाटांनी सांगितले महत्त्वाचे कारण…….
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातली सत्तासंघर्ष गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. शिवसेनेच्या बंडानंतर शिवसेना कुणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर आयोगाने यावर निर्णय दिला. आता शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यावरील निकाल विधान सभा अध्यक्षांकडे दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारत आठवड्यात निर्णय देण्यासाठी आदेश दिले होते. आता यावरील कारवाईंना वेग आल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावले आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशानंतर आता राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते आता काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर दिल्लीला नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले आहेत, यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा

राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. त्यात विशेष काही नाही.”

दिल्लीत होणार चर्चा

“सर्वोच्च न्यायालयाने काही कालमर्यादा दिली नाही. पण न्यायालयाने सांगितलंय की, ही कारवाई थोडी जलद गतीने करा. यासाठी प्रक्रिया डावलून कारवाई करा, असं म्हटलं नाही. त्यामुळे प्रक्रियेप्रमाणे ही कारवाई करायची आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांसाठी जेवढा वेळ लागणार आहे, त्यासंदर्भात दिल्लीत चर्चा होईल,” अशी माहिती शिरसाट यांनी दिली.

आमदार संजय शिरसाट पुढे म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? या दोन्ही न्यायीक संस्था आहेत. यामध्ये कुठे ना कुठे एकमेकांच्या अधिकारांवर गदा येतेय का? हाही प्रश्न उपस्थित होतोय. म्हणून कदाचित या चर्चेसाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत.”

 

Web Title: Big update on maharashtra power struggle rahul narvekar immediately left for delhi sanjay shirsat told the reason know the detail what they say nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2023 | 03:38 PM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
1

Supreme Court: ‘रात्री १० वाजताही प्रत्येक महिलेला….’, बलात्काराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
2

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
3

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.