Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Contempt Case: तुम्ही अनुभवी राजकारणी..; संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल

Sanjay Raut Contempt Case: सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी संजय राऊत यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला. राऊत यांनी वक्तव्याबद्दल माफी मागितली असली, तरी त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 17, 2026 | 05:13 PM
Supreme Court, Sanjay Raut, Nikhil Wagle, Judiciary,

Supreme Court, Sanjay Raut, Nikhil Wagle, Judiciary,

Follow Us
Follow Us:
  • माफीनाम्यानंतरही संजय राऊत यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा SCBA चा न्यायालयात आरोप.
  • माफी मनापासून असावी, डोक्याने नव्हे,” सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायालयाने दिला संयमाचा सल्ला.
  • संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनाही सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश.
Sanjay Raut Contempt Case:  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (१७ नोव्हेंबर) खडे बोल सुनावले आहे. या प्रकरणात संजय राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी माफीनामा सादर केला. पण त्यांच्या माफीनाम्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला. यावर न्यायालयाने दोघांनाही अधिक सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करावेत, असे निर्देश दिले आहेत. तसेच, पुढील सुनावणीला दोघांनीही व्यक्तिशः उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायव्यवस्थेबद्दल कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (SCBA) फौजदारी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Bhandara News: कुपोषणाचे आव्हान अद्यापही कायम! १०४ बालके अतितीव्र कुपोषित; पवनीत कमी वजनाची बालके सर्वाधिक

माफीनाम्यानंतरही सोशल मीडिया पोस्ट केल्याचा आरोप

ऑक्टोबर महिन्यात सरन्यायाधीशांनी राहुल गांधी आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटीची वेळ नाकारली होती. याप्रकरणी निखिल वागळे आणि संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. वागळे यांनी सरन्यायाधीशांच्या पदाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा, तर राऊत यांनी सरन्यायाधिशांवर पक्षपाताचा आरोप केल्याचा दावा करण्यात आला.

या वक्तव्यांनंतर सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देताना राऊत आणि वागळे यांनी माफीनामा सादर केला. सुनावणीवेळी राऊत न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होते, तर वागळे ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

Cabinet Decisions : राज्य सरकारचे मोठे निर्णय! शिक्षण क्षेत्रातही होणार महत्त्वाचे बदल, जाणून घ्या चार महत्वाचे निर्णय

‘माफीनाम्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाविरोधात पोस्ट’

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी संजय राऊत यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला. राऊत यांनी वक्तव्याबद्दल माफी मागितली असली, तरी त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप त्यांनी केला. या पोस्टमध्ये आंदोलक न्यायालयाच्या इमारतीला आग लावताना दिसत असल्याचे राय यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या नंतरच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

‘तुम्ही अनुभवी नेते, संयमाचे महत्त्व समजायला हवे’

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी संजय राऊत यांना त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील अनुभवाची आठवण करून दिली. राऊत हे अनुभवी नेते असून, ते अनेक वर्षांपासून खासदार आहेत. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातही कार्यरत आहेत, असे न्यायालयाने नमूद केले. राऊत यांची भाषणे आपण वकील असल्यापासून ऐकत आलो आहोत, असे सांगत न्यायमूर्ती कुमार यांनी सार्वजनिक जीवनात बोलताना सभ्यता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘तुम्ही एक अनुभवी नेते आहात. तुम्हाला संयमाचे महत्त्व माहीत असायला हवे,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती न्यायालयाला दिली. राऊत यांना कर्करोग आणि हृदयरोग असल्याचे त्यांनी सांगितले.

८ डिसेंबरला पुढील सुनावणी

सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनाही अधिक सुधारित प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच, पुढील सुनावणीवेळी दोघांनीही व्यक्तिशः न्यायालयात उपस्थित राहावे, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे दोघेही त्या दिवशी न्यायालयात काय भूमिका मांडतात आणि त्यांच्या सुधारित प्रतिज्ञापत्रात काय नमूद केले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना कोणत्या शब्दांत सुनावले आहे?

    Ans: अवमान याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी संजय राऊत यांना सुनावले की, "माफी ही मनापासून यायला हवी, डोक्याने नव्हे. तुम्ही एक अनुभवी राजकारणी आणि पत्रकार आहात, त्यामुळे बोलताना संयम पाळायला हवा."

  • Que: संजय राऊत आणि निखिल वागळे यांना न्यायालयाने कोणते नवीन आदेश दिले आहेत?

    Ans: माफीनाम्यानंतरही सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप झाल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनाही याबाबत स्पष्टीकरण देणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • Que: या प्रकरणाची पुढील सुनावणी कधी होणार आहे?

    Ans: सर्वोच्च न्यायालयाने या फौजदारी अवमान याचिकेची पुढील सुनावणी ८ डिसेंबर २०२६ रोजी निश्चित केली असून, त्यावेळी दोघांनाही न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Supreme court reprimands sanjay raut nikhil wagle contempt case apology affidavit as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • sanjay raut
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं
1

Sanjay Raut : मोदी-भाजपने नेहरूंचे कितीही मूर्तीभंजन केले तरी देशात नेहरूच राहतील! राऊतांनी मोदी-भाजपला सुनावलं

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं
2

NCP Merger : राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ! सुनील शेळकेंनी स्पष्टच सांगितलं

‘मराठी माणसाबद्दलचा कळवळा ढोंगीपणा’; राम कदमांची संजय राऊतांवर टीका
3

‘मराठी माणसाबद्दलचा कळवळा ढोंगीपणा’; राम कदमांची संजय राऊतांवर टीका

Supreme Court on Foreign Divorce:परदेशातील घटस्फोट भारतात अमान्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
4

Supreme Court on Foreign Divorce:परदेशातील घटस्फोट भारतात अमान्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.