BJP Amit shah in pune NDA Live bajirao peshwe Statue unveiling political news update
Amit Shah Pune Live : पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह यांनी पुण्यामध्ये बाजीराव पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले आहे. खडकवासला येथील एनडीए येथे स्वराज्याचे पेशवे अर्थात बाजीराव पेशवे यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. एनडीएमध्ये सैनिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांना शौर्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे. अमित शाह यांच्या हस्ते अनावरण सोहळा पार पडला असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह महायुतीमधील नेते उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यासाठी एनडीए ही सर्वोत्तम जागा असल्याचे देखील सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अनावरण सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या लढवय्या इतिहासाचा पुनरुच्चार केला. यावेळी अमित शाह म्हणाले की, “पुणे हे स्वराज्याच्या संस्काराचे उगमस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे अदभूत आहे. केवळ वयाच्या 12 वर्षी शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने स्वराज्य हा ध्यास घेतला असेल आणि आपल्या आय़ुष्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असेल. केवळ 12 वर्षाचा युवक हा देशाला स्वातंत्र्य देण्याची भावना निर्माण करतो. आणि सर्व शाहींच्या विरोधात लढा देतो ही एक अकल्पनीय पराक्रम आहे. केवळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात स्वराज्याचा संस्कार पेरले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराज, वीर ताराबाई, धनाजी, संताजी अशा अनेकांनी हा विचार जपला,” अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “केवळ 19 व्या वर्षी शाहू महाराजांनी त्यांची पारख करुन त्यांना पेशवे म्हणून निवडले. पेशवे झाल्यानंतर त्यांनी 20 वर्षात 41 युद्ध केली. आणि त्यातील एकामध्येही हार मिळवली नाही. असा पराक्रम कोणत्याही सेनापतीने केला नसेल. मृत्यूपर्यंत त्यांनी पराजयाला आपल्या जवळ देखील येऊ दिले नाही. अशा वीर सेनानींचा पुतळा लावण्याचे सर्वात उत्तम स्थान हे एनडीए आहे. बाजीराव पेशवे हे आज काळातही सर्वांचे आदर्श आहेत. बाजीराव पेशवे यांचा पुतळा माझ्या गावामध्ये देखील आहे. एनडीए ही जागा बाजीरावांचा पुतळ्यासाठी अतिशय योग्य आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या देशांतील जवानांना हा पुतळा युद्धातील नीती, समर्पण, व्हूरचना, देशभक्ती आणि युद्धातील बलिदान याची प्रेरणा बाजीराव पेशवे देत आहेत. मागील 500 वर्षातील या सर्व गुणांचे सर्वात्तम उदाहरण असेल तर ते मी इतिहासाचा अभ्यासक म्हणून सांगतो ते केवळ श्रीमंत बाजीराव पेशव्यांमध्येच आहे” अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमित शाह पुढे म्हणाले की, “मराठा साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले. अफगाणिस्तान, बंगाल आणि कटकपर्यंत त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला. हा बाजीरावांचा पुतळा अश्वारुढ आहे. कोणत्याही व्यक्तीचा जन्म हा घोड्यासोबत झाला नाही. मात्र बाजीराव पेशवे असे व्यक्ती आहेत ज्यांचा जन्मच घोड्यासोबत झाला आहे हे वाक्य मी कधीही विसरणार नाही. बाजीराव पेशवे यांच्या सैन्यात एका सैनिकाला तीन घोडे दिले जात असतं. घोडे थकत असत मात्र सैन्य थकत नसे. बाजीराव पेशवे यांना काही लोक अजिंक्य योद्धा म्हणतात त्यांनी अमर असा इतिहास त्यांनी लिहिला. माझ्या जीवनात कधीही नैराश्य आल्यासारखं वाटतं तेव्हा मला बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराज यांचा विचार मनात येतो. आणि माझे नैराश्य लांब जाते,” अशा भावना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.