मुंबई – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली जात आहे, सीमा प्रश्नावर महाराष्ट्रातील लोकांच्या भावना तीव्र आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यातील सरकार बैठका घेत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra karnatak) वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र कर्नाटकच्या भूमिकेवर राज्यातीव तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच केंद्रातील व राज्यातील भाजपाला (BJP) लक्ष्य केलं जात आहे.
[read_also content=”राज्यपालांच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी केलं ‘हे मोठं’ वक्तव्य, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/ajit-pawar-big-statement-about-governor-resignation-350323.html”]
दरम्यान, जत तालुक्यातील काही गावांना कर्नाटक सरकारने पाणी दिले आहे. तसेच या तालुक्यातील काही गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक आहेत. त्यामुळं या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर व भाजपावर निशाना साधला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सीमा प्रश्नी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे. सांगलीतील काही गावं कर्नाटकला देण्याचा भाजपाच कट आहे, असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे. केंद्रात व कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे. त्यामुळं सांगलीतील काही गावं ही कर्नाटकच्या स्वाधीन करण्याचं षडयंत्र भाजपा रचत आहे.
कारण भाजपाला सीमावादावर तोडगा काढायचा नाहीय. तसेच सांगलीतील काही गावं ही कर्नाटकला द्याची आहेत. म्हणून भाजपा यावर काही भूमिका घेत नसल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी भाजपावर केला आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेते बोलण्यासाठी स्किप्ट देतात, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता सुषमा अंधारेंनी भाजपावर सीमा प्रश्नी दुसरा गंभीर व खळबळजनक आरोप केला आहे. कर्नाटकने सांगलीतील काही गावांना पाणी सोडल्यानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी जतच्या 42 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे.