Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “मित्राच्या नात्याने सल्ला देतो की…”; राज ठाकरेंनी निवडणुकांच्या निकालावर संशय घेताच भाजपचा पलटवार

निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्याचा काळ लोटला तरी राज्यात अभूतपूर्व अशी शांतता पसरली आहे. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 30, 2025 | 09:30 PM
“मित्राच्या नात्याने सल्ला देतो की…”; राज ठाकरेंनी निवडणुकांच्या निकालावर संशय घेताच भाजपचा पलटवार

“मित्राच्या नात्याने सल्ला देतो की…”; राज ठाकरेंनी निवडणुकांच्या निकालावर संशय घेताच भाजपचा पलटवार

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिन्याचा काळ लोटला तरी राज्यात अभूतपूर्व अशी शांतता पसरली आहे. असा निकाल कसा काय लागला? याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. फक्त पराभव झालेलेच नाही, तर ज्यांचा विजय झाला, तेही धक्क्यात आहेत, असं मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केलं. त्यानंतर राज्यभर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या बोलण्याचा रोख भाजपाच्या विजयाकडे होता. त्यामुळे भाजपाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, “श्रीमान राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात एक नरेटीव्ह स्थापन करण्याचा प्रयत्न केला. तो अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. भाजपाने कधीच तडजोडीचे राजकारण केले नाही. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्रनिर्माण यावरील राजकारणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. यातून तुम्हाला शिकण्यासारखे काही असेल तर नक्कीच शिका. हा मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो.”

राष्ट्र प्रथम मानून
राष्ट्रवादी विचारधारेचा राष्ट्रीय पक्ष म्हणून “राष्ट्रनिर्माण” चे काम करताना…

◆अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणात आम्ही कधीच तडजोड केली नाही.

◆”एक देश एक निशान एक संविधान” असायला हवे म्हणून काश्मीर मधून 370 हटवण्याच्या विषयावर आम्ही कधीच तडजोड केली नाही.…

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2025

“राज ठाकरे यांनी जर तडजोडीचे आरोप केले असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की, अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणात आम्ही कधीच तडजोड केली नाही. काश्मीर मधून कलम ३७० हटवण्याच्या विषयावर आम्ही कधीच तडजोड केली नाही. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत कधीच तडजोड केली नाही आणि होणार नाही. वेळ, काळ आणि राजकीय परिस्थिती पाहून सरकारे चालवताना जे तात्कालिक घडते, ज्याचा श्रीमान राज ठाकरे जो अर्थ लावून त्याचे सवंग “निरुपण” ते करू पाहत आहेत”, अशी टीकात्यांनीकेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जनसमर्थन वाढते आहे. याच्यातून तुम्हाला काही शिकता आले तर बघा, हा राज ठाकरे जींना मैत्रीपूर्ण सल्ला!@BJP4Maharashtra @BJP4Mumbai #AshishShelar #Bjp #Maharashtra pic.twitter.com/glntDFKFn1

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2025

केवळ १ खासदार असलेल्या अजित पवारांचे ४१ आमदार कसे काय निवडून आले? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “राज ठाकरे यांना नेहमीच उशीरा उठून चिंतन करण्याची सवय असल्यामुळे विधानसभेत स्वतःच्या घरातच दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आमच्या ४२ जागा कशा आल्या? हा शॉक त्यांना दीड महिन्यांनी बसला आहे. मात्र आपल्या सुपुत्राचा दारूण पराभव कसा झाला आणि पक्षाची एकही जागा का निवडून आली नाही. यावर त्यांनी भाष्य करावे. यासाठी त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून कामाला लागले पाहीजे.” असा टोला लगावला आहे.

Web Title: Bjp leader ashish shelar slams raj thackeray on maharashtra vidhan sabha election result statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 09:21 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Election Result
  • Maharashtra Election
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
2

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.