Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narayan Rane : ‘साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही…’ बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणीने नारायण राणे भावुक

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांनी आदरांजली वाहीली. यावेळी ते भावुक झाल्याचं पहायला मिळालं.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 23, 2025 | 11:50 PM
'साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही...' नारायण राणे भावुक का झाले?

'साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही...' नारायण राणे भावुक का झाले?

Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे माजी नेते नारायण राणे यांनी आदरांजली वाहीली. यावेळी ते भावुक झाल्याचं पहायला मिळालं. बाळासाहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे. अशा शब्दात आपल्या भावना नारायण राणे यांनी व्यक्त केल्या. त्यांनी आपलं आत्मचरित्र झंझावात यात ही हित गोष्ट लिहीली आहे. त्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने केला आहे. याबाबत एक पोस्ट राणे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

साहेब 🙏#BalasahebThackeray pic.twitter.com/w3bK4h6Je1

— Narayan Rane (@MeNarayanRane) January 22, 2025

नारायण राणे यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केले. त्यानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात अंतर निर्माण झाले. बाळासाहेब हयात असताना राणे यांनी केलेल्या या कृती मुळे ते संतापले होते. पण बाळासाहेबांचा आपल्यावर कधीही राग नव्हता असं राणे नेहमी सांगत आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपण शिवसेना सोडली असं राणे नेहमी सांगत आले आहेत. बाळासाहेबांना आपण शिवसेनेत हवे होतो असंही ते सांगतात. पण नाईलाजाने शिवसेना सोडवी लागली असं राणेंचं म्हणणं आहे. शिवसेना सोडल्यानंतर राणे यांनी सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली पण बाळासाहेबांबद्दल ते कधी ही काही बोलले नाहीत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नारायण राणे यांनी एक ट्वीट केले आहे. त्या ते म्हणतात. आज साहेबांची जयंती. साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे. साहेबांच्यापुण्यस्मरणासाठी मी माझे आत्मचरित्र झंझावात मधील एक उतारा इथं देत आहे. असं राणे यांनी लिहीलं आहे. त्यात ते पुढे लिहीतात. साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे.असा उल्लेख त्यांनी केला आहे. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी राणे हे काँग्रेसमध्ये होते. शिवाय ते मंत्रीही होते. त्यावेळी राणेंवर शिवसैनिकांचा प्रचंड राग होता. असा स्थितीत त्यांना बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते.

पुढे ते लिहीतात साहेब आणि माँ साहेब माझ्यासाठी सर्वस्व होते. साहेबांच्या निधनाने माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला. आजही मला विचाराल की या जगातली माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे, तर मी बेधडकपणे बाळासाहेब ठाकरे हेच एक नाव घेईन. ते माझ्यासाठी माझं जग होते आणि रहातीलही. माझ्या आयुष्यात कितीही चढउतार येऊ देत. मी आज जो कोणी आहे त्यामागे त्यांचाच आशिर्वाद आहे. हे मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. असंही राणे यांनी लिहीलं आहे.

Web Title: Bjp leader narayan rane emotional post on balasaheb thackeray jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Narayan Rane
  • Shiv Sena UBT Chief Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा
1

Sindhudurg : हत्तींच्या हल्ल्यांवर ठोस कारवाईसाठी ठाकरे सेनेचा इशारा

Uddhav Thackeray Birthday : केवळ राजकारणच नाही तर फोटोग्राफीचा छंद; उद्धव ठाकरेंच्या कॅमेऱ्यातून गडांचं दर्शन कधी घेतलंय का?
2

Uddhav Thackeray Birthday : केवळ राजकारणच नाही तर फोटोग्राफीचा छंद; उद्धव ठाकरेंच्या कॅमेऱ्यातून गडांचं दर्शन कधी घेतलंय का?

10 वर्षानंतरही ठाकरे बालनाट्यगृहाचे काम अर्धवटच; खर्च 2 कोटींवरून 29 कोटींपर्यंत वाढला
3

10 वर्षानंतरही ठाकरे बालनाट्यगृहाचे काम अर्धवटच; खर्च 2 कोटींवरून 29 कोटींपर्यंत वाढला

Sindhudurg : कोकणातील रस्त्यांची दुर्दशा, राणे-गडकरींना राऊत यांचा सडेतोड सल्ला ‪
4

Sindhudurg : कोकणातील रस्त्यांची दुर्दशा, राणे-गडकरींना राऊत यांचा सडेतोड सल्ला ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.