अहमदनगरमध्ये शरद पवार यांची राजकीय खेळी विवेक कोल्हेचा राष्ट्रवादी प्रवेश
अहमदनगर : महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वीच राज्याचे राजकारण रंगले आहे. अद्याप निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तरी देखील राजकारण जोरदार रंगले आहे. पक्षांच्या बैठका, नेत्यांचे दौरे आणि इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गळाला भाजपचे आमदार लागले असल्याची चर्चा आहे. अहमदनगरमध्ये शरद पवार यांनी राजकीय खेळी असून लवकरच भाजप नेता हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चा आहे.
विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नाराजीनाट्य व पक्षप्रवेश सुरु आहेत. दरम्यान, अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपाला धक्का देणार आहे. विवेक कोल्हे हे कोपरगावमधून विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. मात्र महायुतीच्या युती धर्मामध्ये त्यांची पंचाईत झाली आहे. अजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झाली. यामुळे लवकर ते शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे अहमदमनगरमध्ये कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत होण्याची चिन्ह आहेत.
शरद पवारांची राजकीय खेळी
विवेक कोल्हे हे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र आहेत. सध्या ते भाजपमध्ये आहेत. मात्र लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी लोकसभा निवडणूकीच्या वेळी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना धक्का देत निलेश लंके यांचा निवडणूकीपूर्वी पक्षप्रवेश करुन घेतला. आणि अहमदनगरच्या पारनेरमध्ये जागा मिळवली. याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा विधानसभा निवडणूकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुण्यातील इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे आणि कोल्हापुरातील समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याची तयारी सुरु आहे. यामुळे शरद पवार हे विधानसभा निवडणूकीसाठी राजकीय खेळी खेळत आहेत.