Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचं यात भाजप पटाईत’; बच्चू कडूंचा हल्लाबोल

केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 05, 2025 | 09:42 AM
'कुणाला फसवायचं यात भाजप पटाईत'; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

'कुणाला फसवायचं यात भाजप पटाईत'; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘कुठलंही सरकार असू दे ते शेतकरी, शेतमजुरांसाठी नाहीच. जो शेतकरी, कष्टकरी, कामकरी आहे, त्याच्यासाठी लढा द्यावाच लागतो. ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचे? यात लोकांना कसे सत्तेत घ्यायचे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पटाईत आहे’, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

बच्चू कडू यांनी विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले हे त्यांनी सांगावे? मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम, आदिवासी या आरक्षणाला घेऊन गावागावात वाद होता कामा नये. राजकारण बाजूला ठेवायचं आहे. राजकारण जाती-धर्मावर करायचे आणि व्यवस्थित समीकरण जुळवायचे, हे त्यांचे राजकारण सुरू आहे. ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचे? यात लोकांना कसे सत्तेत घ्यायचे? मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप पटाईत आहे. तिथे जे कौशल्य वापरतात ते कौशल्य या आरक्षणाच्या मुद्याला घेऊन का वापरत नाही. त्यात वाद होईल यासाठी का वापरतात’.

तसेच केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल प्रहार नेते बच्चू कडू यांनी भाजपवर केला.

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मिळत नाही हमीभाव

बच्चू कडू पुढे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळत नाही. मात्र, लगतच्या छोट्याशा छत्तीसगड राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला 3100 प्रती क्विंटल हमीभाव मिळतोय आणि महाराष्ट्रात कमी दर मिळतो. छत्तीसगडमध्ये एका एकरात 12 ते 13 हजार रुपये दर देतो तर महाराष्ट्रात हेक्टर मागे 15000 रुपये देतो एवढी मोठी तफावत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असताना सुद्धा इथे तूर, कापूस, भात उत्पादक शेतकरी मरतोय. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले, हे त्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Ex mla bachchu kadu criticized on maharashtra government over many issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • political news

संबंधित बातम्या

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत
1

Dharashiv News: तेर गटात अपक्ष अर्चना पाटील यांची उमेदवारी कायम; भाजपातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणुकीत रंगत

Karjat News : कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाची भाजप आणि शेकाप बरोबर महायुती; महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
2

Karjat News : कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाची भाजप आणि शेकाप बरोबर महायुती; महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा

Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
3

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका
4

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.