Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EC On Bihar Election: मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार बिहार निवडणुकीचा निकाल? कोणाच्या हातात जाणार सत्ता? वाचाच…

Bihar Politics: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोग लवरकच बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2025 | 08:36 PM
EC On Bihar Election: मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार बिहार निवडणुकीचा निकाल? कोणाच्या हातात जाणार सत्ता? वाचाच…
Follow Us
Close
Follow Us:

वर्षा अखेरीस बिहारमध्ये निवडणूक होणार 
निवडणूक आयोग लवकरच तरखांची घोषणा करणार 
बिहारच्या मतदार यादीवरून राजकारण पेटले

Election Commision On Bihar Assembly Election 2025: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोग लवरकच बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकतो. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोग 30 सप्टेंबर ‘एसआयआर’नंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. ही अंतिम मतदार यादी असणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग विधानसभेच्या तारखांची घोषणा करू शकतो. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल दिवाळीनंतर लागण्याचा अंदाज आहे.

बिहारची विधानसभा निवडणूक ही यंदा केवळ 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. कदाचित तीन टप्प्यात मतदान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 ला संपणार आहे.  22 तारखेनंतर बिहार विधानसभा भंग होईल. 22 तारखेच्या आधी नवीन विधानसभा गठित न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल.

BJP-JDU मुळे चिराग पासवानांना फटका

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये जागांवर समन्वय झाला असून दोन्ही पक्ष समान जागांवर निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तर चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने ४० जागांची मागणी केली आहे. ६-७ विधानसभा जागा एचएएम पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाच्या खात्यात जाऊ शकतात. असेही सांगितले जात आहे.

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीत काय असेल जागावाटपाचा फॉर्म्युला; BJP-JDU मुळे चिराग पासवानांना फटका

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेडीयू आणि भाजप १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने ११५ जागांवर आणि भाजपने ११० जागांवर तर त्यावेळी एनडीएचा भाग असलेल्या व्हीआयपीने ११ आणि एचएएमने ७ जागा लढवल्या होत्या. तर एनडीएसोबत नसलेल्या एलजेपी पक्षाने १३५ जागांवर निवडणूक लढवली होती. पण १३५ पैकी त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. भाजपने ७४ जागा जिंकल्या, तर जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळवला. पण यावेळी जेडीयू १०० पेक्षा कमी जागांवर सहमत होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी ४० जागांची मागणी करत आहे. पण त्यांना फक्त २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उरलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांना दिल्या जाऊ शकतात. जर मुकेश साहनी यांचा पक्ष व्हीआयपी, जो सध्या आरजेडी-काँग्रेस महाआघाडीचा भाग असलेल्या मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्ष आाघाडीतून बाहेर पडला तर समीकरणे बदलू शकतात.

 

Web Title: Election comission chance to declare bihar election 20 november result politcal bjp rjd congress news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • BJP
  • Congress
  • Election Comission

संबंधित बातम्या

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल
1

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
2

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

सरकारच्या GR मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक…; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप
3

सरकारच्या GR मधून मराठा आणि ओबीसी दोघांची फसवणूक…; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…
4

Congress News: “काळजी करू नको, तुझी डिलिव्हरी…”; ‘या’ काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.