Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: पुणे महापालिकेत महायुतीत बिघाडी? आठवले गटाची भाजपवर उघड नाराजी

महापालिका निवडणुकीत भाजपने काही जागा मित्रपक्ष आरपीआयसाठी सोडल्या होत्या. या जागांवर आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळविला.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 18, 2026 | 11:50 AM
PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

Follow Us
Follow Us:
  • पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यात मतभेद
  • उपमहापौर पदाला आवश्यक तो मान दिला जात नसल्याचे वाडेकरांची तक्रार
  • महापालिका निवडणुकीत भाजपने काही जागा मित्रपक्ष आरपीआयसाठी सोडल्या
Pune Politics: पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी उपमहापौर पदाला अपेक्षित सन्मान दिला जात नसल्याची खदखद व्यक्त करत भाजपच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करून सत्तेत आलेल्या आरपीआयला भाजपने उपमहापौरपद दिले होते. मित्रपक्षाला सत्तेत योग्य स्थान दिल्याचा संदेश त्यावेळी गेला होता. मात्र, प्रत्यक्षात उपमहापौर पदाला आवश्यक तो मान दिला जात नसल्याचे वाडेकर यांनी स्पष्ट केले.

इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

शहरात आयोजित विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने महापौरांसोबत उपमहापौरांचे नाव पत्रिकेत असले तरी प्रत्यक्ष कार्यक्रमात त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची तक्रार त्यांनी केली. विशेषतः ‘महापौर चषक क्रीडा’ स्पर्धांच्या आयोजनात उपमहापौर पदाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. औंध-बोपोडी प्रभागात झालेल्या एका स्पर्धेसाठीही उपमहापौर म्हणून निमंत्रण न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. “हे प्रकार नजरचुकीने होत आहेत की जाणीवपूर्वक, हेच समजत नाही,” अशी खंत वाडेकर यांनी व्यक्त केली.

महापालिकेतील अनेक बैठका आणि कार्यक्रमांसाठी उपमहापौरांना निमंत्रणच पाठविले जात नसल्याची गंभीर बाबही त्यांनी उघड केली. काही वेळा कार्यक्रम झाल्यानंतरच महापौरांकडून ‘तुम्हाला निमंत्रण मिळाले नव्हते का?’ अशी विचारणा केली जाते. याबाबत चौकशीचे आश्वासन दिले जात असले तरी परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याचे वाडेकर यांनी नमूद केले. तसेच, काही कार्यक्रमांमध्ये उपमहापौरांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था देखील केली जात नसल्याने त्यांना प्रेक्षकांमध्ये बसावे लागल्याचे त्यांनी सांगितले. “या पदापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष केला आहे आणि पुढेही सन्मानासाठी संघर्ष करत राहणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा फेरबदल; तब्बल 400 कोटींची अतिरिक्त तरतूद

दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपने काही जागा मित्रपक्ष आरपीआयसाठी सोडल्या होत्या. या जागांवर आरपीआय कार्यकर्त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळविला. १६५ पैकी ११९ जागांवर भाजप विजयी झाला असून त्यात आरपीआयचे प्रतिनिधीही सहभागी आहेत. सत्तास्थापनेवेळी आरपीआयला उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता या पदाला मिळणाऱ्या वागणुकीवरून भाजप-आरपीआयमध्ये तणाव निर्माण होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. येत्या काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“महापालिकेतील बैठका आणि कार्यक्रमांसाठी उपमहापौरांना बोलावले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही कार्यक्रमांमध्ये बसण्याची व्यवस्थाही केली जात नाही. अनेक वेळा प्रेक्षकांमध्ये बसून कार्यक्रम पाहावे लागले. या सन्मानासाठी पुढेही संघर्ष करणार.”
— परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे महापालिका

 

 

 

 

Web Title: Bjp rpi alliance in trouble allegations of disrespect over deputy mayor post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
1

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?
2

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

गेल्यावर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा रस्त्यांवर खड्डे कमी; महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा
3

गेल्यावर्षीच्या तुलनेत पुण्यात यंदा रस्त्यांवर खड्डे कमी; महापौर मंजुषा नागपुरे यांचा दावा

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांनाही सुचवता येणार विकासकामे; 31 ऑगस्टपर्यंत…
4

पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांनाही सुचवता येणार विकासकामे; 31 ऑगस्टपर्यंत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.