
BJP-Shiv Sena alliance in Vadgaon Maval for local body elections 2025 BJP candidate Adv Mrinal Mhalaskar
वडगाव मावळ : सतीश गाडे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे आचारसंहिता लागू झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान,वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी–शिवसेना महायुतीने उमेदवारी जाहीर करून राजकीय वातावरण तापवले आहे. नगराध्यक्ष पदासाठी ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करताना १७ पैकी १४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली.
या परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबूराव वायकर, ज्येष्ठ नेते अविनाश बवरे, सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण, चंद्रशेखर भोसले, दामोदर भंडारी, तुकाराम काटे, विजय जाधव, मिलिंद चव्हाण, बंडोपंत भेगडे, संभाजी म्हाळसकर, नारायण ढोरे, सुधाकर ढोरे, किरण भिलारे, बाळासाहेब कुडे, नाथा घुले, रवींद्र म्हाळसकर, भूषण मुधा, कल्पेश भोंडवे आणि प्रसाद पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
युतीने ‘उच्चशिक्षित आणि कार्यक्षम’ उमेदवार देण्यावर भर
भास्करराव म्हाळसकर म्हणाले की, “वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपा–शिवसेना महायुतीकडून लढविण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेला प्रभाग १ मध्ये एक जागा देण्यात आली आहे. यावेळी उच्चशिक्षित व कार्यक्षम उमेदवार लोकांसमोर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपा–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्षपद – ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर
प्रभाग निहाय उमेदवार
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोठा राजकीय धक्का : राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवक तालुकाध्यक्षांचा भाजपात प्रवेश
वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल वहिले आणि वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. विशाल वहिले हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपसरपंच पदावर कार्यरत होते, तर पूजा वहिले यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. आज महायुतीमध्ये प्रवेश करून त्यांनी स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण केली आहेत. भाजप–शिवसेना युतीच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमासोबत झालेला हा प्रवेश स्थानिक राजकारणाचा ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.