Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Shirdi Convention: महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं अधिवेशन; शाह, नड्डा देणार कार्यकर्त्यांना कानमंत्र

या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजप स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आपली रणनीती ठरवेल आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज करण्यावर भर देईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 11, 2025 | 01:21 PM
BJP Shirdi Convention: महापालिका निवडणुकीसाठी भाजपचं अधिवेशन; शाह, नड्डा देणार कार्यकर्त्यांना कानमंत्र
Follow Us
Close
Follow Us:

शिर्डी:  विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व  यशानंतर  महायुतीला आता राज्यातील महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (12 जानेवारी) शिर्डीत  भाजपचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आली आहे. या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असून,  ते जवळपास 15 हजार भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभेनंतर आता महापालिकांची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप काय रणनीती आखेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात दोन प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार होणार आहे.  पहिला मुद्दा म्हणजे भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, आणि दुसरा म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळावर यश मिळवण्यासाठी रणनीती आखणे. शिर्डीत होणाऱ्या या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात आयोजित अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी लक्ष्य देण्यात आले होते. त्या रणनीतीमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठीही अशाच प्रकारच्या नियोजनावर भर देण्याची अपेक्षा आहे. शिर्डीत होणाऱ्या या अधिवेशनाकडे पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या उत्साहाने पाहत आहेत.

मी मिनी पाकिस्तानात लढतोय; भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

 स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याची तयारी

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशामुळे भाजप आणि त्यांचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. त्यानंतर आता भाजपने महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर केंद्रित केले आहे. उद्यापासून शिर्डीत सुरू होणाऱ्या एक दिवसीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपकडून या निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची चाचपणी केली जाणार आहे.

भाजपचे वरिष्ठ नेते या अधिवेशनादरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेणार आहेत. तसेच, संघटनात्मक विस्तारासाठी नव्या योजना आखण्यात येणार आहेत. गेल्या वेळी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रथम क्रमांक मिळवला होता. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

पुन्हा चालले ‘ट्रम्प कार्ड’! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निर्दोष मुक्तता; जाणून घ्या निर्णयात काय म्हणा

सदस्य नोंदणी मोहीम आणि संघटनात्मक बांधणी
सध्या भाजपकडून सदस्य नोंदणी मोहीम जोरात सुरू आहे. एका विधानसभा मतदारसंघात 80 ते 90 हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या माध्यमातून पक्ष संघटनेची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे:

  • स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार: राज्यातील आगामी निवडणुकांसाठी भाजप महाविजय 3.0 अभियानाची सुरुवात करणार आहे.
  • नेत्यांचे सत्र आणि मार्गदर्शन:
    • अधिवेशनाची सुरुवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करतील.
    • पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने होईल.
    • दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देतील.
  • वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन:
    • राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निवडणुकीसाठी पक्षाला दिशा देतील.
  • मुख्यमंत्र्यांच्या बैठक:
    • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आमदार आणि मंत्र्यांसोबत बैठका घेणार आहेत.

या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजप स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आपली रणनिती ठरवेल आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज करण्यावर भर देईल.

Web Title: Bjps convention in shirdi for municipal elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • JP Nadda
  • shirdi

संबंधित बातम्या

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
1

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
2

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
3

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन
4

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.