भाजपच्या 'या' आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं, कारणही आलं समोर... (File Photo : BJP)
सांगली : ” कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, या घोषणा बरोबरच आहेत. आम्हीही मिनी पाकिस्तानात लढतोय, पण मी चौकार मारलाय. मिरज विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलोय.” असे वादग्रस्त वक्तव्य माजी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केले.
सुरेश खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात, त्यांच्या या वक्तव्याने मतदारसंघात नाराजी निर्माण झाली आहे. येथे मराठा समाज सांस्कृतिक भवनमध्ये हिंदू एकता आंदोलन व हिंदू व्यवसाय बंधूतर्फे हिंदू गर्जना सभा झाली. मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे प्रमुख वक्ते होते.
खाडे म्हणाले, भारत हे हिंदू राष्ट्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पावले हिंदू राष्ट्राच्या दिशेने पडत आहेत. भाजप महायुतीला लोकसभेला अपयश आले. मात्र विधानसभेला बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, या नाऱ्यावर हिंदू एकत्र आले. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले. ज्यांनी साथ दिली नाही, त्यांचा कार्यक्रम करणार आहोत. ठोकायचे तिथे ठोकणार आणि रुजवायचे तिथे रुजवणार. असेही ते यावेळी म्हणाले.
सांगली, मिरजेतील दोन्ही कत्तलखाने तातडीने बंद करा : राणे
यावेळी नितेश राणे म्हणाले, राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू आहे. महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरजेतील दोन्ही कत्तलखाने तातडीने बंद झाले पाहिजेत, अशी सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर सभेत महापालिका आयुक्तांना केली. मिरज व कुपवाडमध्येही फिश मार्केट उभारू, प्रस्ताव द्या, तातडीने मंजूर करू, अशी घोषणाही त्यांनी केली.
हे सुद्धा वाचा : सोन्याची चकाकी ठरली खोटी; बनावट दागिने देऊन 10 लाखांची फसवणूक
नितेश राणेंचं मोठं विधान
नितेश राणे यांनीही मोठं विधान केल आहे. भारतात सर्वात जास्त हिंदू राहत असल्याने भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, त्यामुळे कोणत्याही अन्य सर्टिफिकेटची गरज नाही. मी फक्त हिंदू मतावरच माझ्या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलो आहे, मी मतासाठी कोणत्याही मोहल्यात गेलो नव्हतो. ज्या हिंदूंनी आम्हाला निवडून दिलं आहे त्यांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे, असे मोठे विधान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी हिंदूचे ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, असे आक्षेपार्ह विधान नितेश राणेंनी केले आहे. राणेंनी विशाळगडाच्या उरुसाचा मुद्दा पुन्हा गिरवला आहे.