काय घडलं नेमकं?
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे एका ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीची निरघून हत्या केल्याचे समोर आला आहे. कोयत्याच्या सहाय्याने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच केवळ दोन तासात आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली आहे. हत्येची घटना शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्या घराशेजारी ऊसतोड मजूर ऊस तोडीसाठी वस्ती करून राहिले होते. त्यांच्याच घराजवळ पहाटे ही घटना घडली. हे ऊसतोड मजूर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरातले आहेत.
पहाटेच्या सुमारास एका महिलेवर हल्ला होऊन ती जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन या जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मी भानुदास वाघ या 35 वर्षीय असे आहे. ही हत्या महिलेच्या पती भानुदास वाघ यांनी केल्याचा पोलिसांना संशय होता.
दोन तासात अटक
पोलिसांनी तातडीने परिसरात शोध सुरु केला असता आरोपी पती भानुदास वाघ हा पोलिसांना सापडला.पोलिसांनी त्याला अवघ्या दोन तासात अटक केली. या हत्या झालेल्या पत्नीला दोंन लहान मुले आहेत. महिलेच्या पतीने पत्नीची का हत्या केली याचे कारण समोर आले नाही आहे. पोलीस त्याचा देखील शोध घेत आहेत. ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
Manoj Jarange Patil threat News: ‘मी मनोज जरांगेला गोळ्या घालून…’; कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल
Ans: पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर आणि ठाण्यातील गावदेवी मैदान परिसरात.
Ans: हो, गोपाळपूर प्रकरणात पोलिसांनी दोन तासांत आरोपीला अटक केली.
Ans: पत्नीच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; तपास सुरू आहे.






