संभाजीनगर : मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं (Ashish Sakharkar) निधन झालं. आशिष साखरकर हे बॅाडीबिल्डिंग जगतातील एक मोठं नाव आहे. त्यांनी मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यांसारखे अनेक खिताब आपल्या नावावर केलं आहेत. काही दिवसांपासून आशिष आजाराशी झुंज देत होता. अखेर ही झुंज अपयशी ठरली. आज आशिषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बॉडीबिल्डर आशिष साखरकर याने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तर चार वेळा मिस्टर इंडिया विजेतेपद, चार वेळा फेडरेशन कप विजेता यांसह मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप महाराष्ट्र श्री, मुंबई श्री अशा अनेक बिरुदावली अभिमानाने मिरवणारा आहे.
फक्त महाराष्ट्राचं नाही तर पूर्ण भारत आयकॉन अलिबागसह भारताचे नाव सातासमुद्रापार उंचावणारा कोहिनूर हिरा हरपला..!






