मस्करवाडीत गोठ्याखाली जनावरे दबली, पत्रे उडाले कराड तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्याने शेती पिकांसह जनावरं, घरे आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. उंडाळे आणि मस्करवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. कराड तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांना अक्षरशः हैराण करून सोडलं. उंडाळे गावात पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलर पॅनल्स फुटले आहेत. अनेक घरांचेही नुकसान झाले असून चारचाकी वाहनांच्या काचा तडकल्या आहेत. या अनपेक्षित गारपिटीमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.