
Bogus disabled certificate issued in Nanded, false teacher and employee replaced
Nanded News : नांदेड : बीड जिल्हा परिषदेमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर प्रशासनाने दणका देत १८ कर्मचाऱ्यांना त्यात १४ शिक्षकांसह निलंबित केले. मुख्य सचिव तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील दिव्यांग लाभधारकांच्या कागदपत्रांची जलद, काटेकोर तपासणी करण्यात आली. प्रमाणपत्र केळेत न दिल्याने आणि पुरावे अपुरे असल्याने १०० हून अधिक जणांच्या चौकशीला सुरुवात झाली.
याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा परिषदेत समोर आलेली परिस्थिती पूर्णपणे विरुद्ध चित्र मांडते. निगमवाडा पद्धतीने जिल्हा परिषदेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आली होती. हा गंभीर आरोप उघडकीस येत असत्तानाही ठोस कारवाईचा अभाव दिसून येतो. प्राथमिक शिक्षण विभागातील काही शिक्षकांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली घेतल्याचा नागरिकांकडून आरोप होत असतानाही कारवाईची प्रक्रिया ‘तपासणी कोण करणार?’ या प्रशासकीय फुटबॉलमध्ये अडकून पडली आहे.
शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सर्व कागदपत्रे उपसंचालक, आरोग्य विभाग लातूर यांच्याकडे पाठविली होती; मात्र तेथून तपासणी फाईल मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाकडे वळविण्यात आली. जे.जे. रुग्णालयाने ही तपासणी त्यांच्या अधिकारक्षेत्राचाहेर असल्याचे सांगून पुन्हा फाईल नदिडकडे धाडल्याचे समजते. परिणामी, बोडप्रमाणे जलदगतीने निर्णय होण्याऐवजी नदिडमध्ये चौकशीची चाके थंडावलेली दिसतात.
हे देखील वाचा : विरोधकांचा चहापानवर बहिष्कार! विजय वडेट्टीवारांनी थेट वाचली रखडलेल्या प्रकल्पांची यादी
दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणणारा प्रकार
दरम्यान, काही प्रकरणांत तात्पुरत्या प्रमाणपत्राऐवजी सरळ कायम दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. बीडने प्रशासनिक इच्छाशक्ती दाखवत चनावट दिव्यांग प्रमाणपत्रधारकांच्या मुसक्या आवळल्या, पण नांदेडमध्ये मात्र तपासणीच्या फाईल्स दरवाजे ठोठावत फिरत असताना, नियमबास प्रमाणपत्रांवर लाभ घेणारे शिक्षक आणि कर्मचारी सुखाने आपापल्या पांवर बसलेले दिसतात. खन्य दिव्यांगांच्या हक्कावर गदा आणणाम हा प्रकार असून निलंबनाच नाही तर निर्णायक, ठोस, आणि उदाहरणादाखल कारवाईच नागरिकांकडून मागणी होत आहे.
हे देखील वाचा : भारताला खऱ्या अर्थाने आले ‘अच्छे दिन’? पंतप्रधान मोदींच्या मैत्रीने दिल्लीत आले व्लादिमीर पुतिन
सीईओंच्या निर्णयाकडे लागले लक्ष
हृदय शस्त्रक्रिया झालेल्या १३ शिक्षकांनी बदली अथवा बदलीमध्ये सूट घेतली होती घेतलेला लाभ व वैद्यकीय कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे या शिक्षकांनी चुकीचा लाभ घेतला आहे, असे ‘निदान ‘करत मुख्य कार्यकसी अधिकसी मेधना कावली यांनी ४ नोव्हेंबर रोजी या १३ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, गटशिक्षणाधिकान्यांच्या स्पष्ट अभिप्रायासह खुलासा सादर करण्यास सांगितले होते. या शिक्षकांचे खुलासे शिक्षण विभागास प्राप्त झाले असून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी दिली आहे. मुख्य कार्यक्सी अधिकाऱ्यांकडून या शिक्षकांवर नेमकी काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.