महावितरण अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगीरीने विजपुरवठा सुरळीत
गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून रिमझीम पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरण साठ्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी साचलं आहे, तर अर्जुनी मोरगाव तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचून पुरस्थिती निर्माण झाली होती. तर केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना देखील पुराचा फटका बसला. सतत सुरु असलेल्या पावसामुळे या भागातील विजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या 36 तासांपासून केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांमध्ये वीज नव्हती.
हेदेखील वाचा – सातारा आणि रायगडसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे; अतिवृष्टी होण्याची शक्यता; रेड अलर्ट जारी
अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे विज पुरवठा पुन्हा सुरळित करणं कठिण झालं होतं. मात्र गोंदियातील महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या धाडसी कामगिरीमुळे विद्युत पुरवठा पुन्हा सुरळित झाला. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी 3 तास पाण्यात उभं राहून विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरण अधिकाऱ्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. केशोरी परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासांपासून खंडित झाला होता. मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे या ठिकाणी येण्या जाण्याचे मार्गही बंद झाले होते. अशातच विद्युत खांब देखील पाण्याच्या वेढ्यात सापडला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा भर पावसात कोण दुरुस्त करणार असा प्रश्न निर्माण झाला होता.
हेदेखील वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंगा स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास
केशोरी येथील महावितरणाच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून 3 तास पाण्यात उभं राहून विद्युत पुरवठा सुरळीत केला. महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी दोरीच्या साहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत गेले. पाण्यात तीन तास उभे राहून त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला आहे व मागील 36 तासांपासून अंधारात असलेल्या 25 गावात पुन्हा वीजप्रवाह सुरु झाला. महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. महावितरणाच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या या धाडसी कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. केशोरी परिसरात असलेल्या 25 गावांना देखील पुराचा फटका बसला. त्यामुळे या भागांत विजपुरवठा खंडित झाला होता. मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून 3 तास पाण्यात उभं राहून या 25 गावांमधील विजपुरवठा पुन्हा सुरळित केला.