Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: शेतात विहिरी झाल्या, मात्र अनुदान रखडले; पैशासाठी झिजवतात कार्यालयाचे उंबरठे, शेतकरी आर्थिक अडचणीत

Maharashtra Irrigation Well Scheme :शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन विहिरींची कामे पूर्ण होऊनही अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 08:21 PM
Maharashtra Irrigation Well Scheme

Maharashtra Irrigation Well Scheme

Follow Us
Follow Us:
  • शेतात विहीर उभी, अनुदानाची प्रतीक्षा कायम
  • पैशासाठी शेतकऱ्यांच्या कार्यालयाच्या फेऱ्या सुरू
  • सिंचन विहिरींच्या पैशांचा प्रश्न ऐरणीवर
शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, शेतीला बारमाही पाण्याचा आधार मिळावा यासाठी शासनाच्या विविध योजनांतून शेतात सिंचन विहिरी बांधण्यात येत आहेत. मात्र, विहिरीचे काम पूर्ण करूनही संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक महिने कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही अद्याप खात्यावर रक्कम जमा झालेली नसल्याने ‘विहीर झाली, पण अनुदान कधी मिळणार?’ असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

महाराष्ट्रात वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी या रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवल्या जात असून, ४ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार त्यासाठी मार्गदर्शक सूचना आहेत. या योजनेतील विहिरीच्या अनुदानाची कमाल मर्यादा ५ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयाने ४ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात आली. शासनाच्या उपलब्ध माहितीनुसार २०२४-२५ या आर्थिक वर्षातही मोठ्या संख्येने सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली असून, अनेक कामे प्रगतीपथावर होती. शेतकऱ्यांच्या शेतात विहीर उभी राहिली. मात्र, त्या विहिरीसाठी खर्च केलेली रक्कम परत मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ योजना जाहीर न करता मंजूर कामांचे अनुदान वेळेत देण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. संबंधित विभागाने रखडलेल्या अनुदानाचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना वाढता खर्च व विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षा कायम एकीकडे पावसाचे अंदाज, शेतीतील वाढता खर्च आणि उत्पन्नातील अनिश्चितताः त्यात शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा, अशी दुहेरी कोंडी शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. विहीर बांधण्यासाठी कर्ज किंवा उसनवारी करून खर्च केलेल्या शेतकऱ्यांवर अनुदान रखडल्याने आर्थिक भार वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते, शासनाने एखादी योजना जाहीर केली असेल तर त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद आणि वितरणाची यंत्रणा आधीच निक्षित असणे गरजेचे आहे. दरम्यान, शासनाच्या उपलब्ध माहितीनुसार वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींच्या योजनेत कामाच्या मोजमापानुसार अनुदान देण्याची पद्धत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोणत्या टप्प्यावर किती रक्कम प्रलंबित आहे, कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहे आणि निधी कधी उपलब्ध होणार, याची लाभार्थीनिहाय माहिती प्रशासनाने जाहीर करणे आवश्यक ठरणार आहे.

शेतकऱ्यांना नेमकी रक्कम कधी मिळणार ?

विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याऱ्यांनी स्वतःच्या खिशातून खर्च केला आणि त्यातार मिळणाऱ्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागली, तर या योजनेवा उद्देशच बाचित होतो, काम पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रे, मोजमाए मंजुरी, निधी उपलब्धता किंवा योजना बदलल्याची विविध कारणे सांगितली जात असल्याची शेतकन्यांची तक्रार आहे. त्यामुळे संबंधित शेतक-यांना नेमकी रक्कम कधी मिळणार, याचे स्पष्ट वेळापत्रक प्रशासनाने जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच नवं दबाव तंत्र; महामंडळ व विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ग्वाही

Web Title: Maharashtra irrigation well scheme subsidy delay farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Buldhan News
  • Farmers Issues

संबंधित बातम्या

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
1

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.