'महाविकास आघाडीची जिथे सत्ता, तिथे निधी नाही'; मंत्री नितेश राणे यांच्या विधानाने खळबळ
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यातच मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी दिली आहे. नितेश राणे हे कणकवली मतदारसंघटून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांनी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
नितेश राणे यांनी आज मत्स्य आणि बंदर खात्याचा पदभार स्वीकारला. दोन्ही खात्यांमध्ये काय सुरू आहे?काय नवीन करावे लागणार आहे? मी याचा आज आढावा घेतला आहे. त्याबद्दलच्या काही सूचना मी अधिकाऱ्याना दिल्या आहेत.
काय म्हणाले नितेश राणे?
राज्याची आणि देशाची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर आपण अधिक सुरक्षा आणि खबरदारी घेतली आहे. मात्र अजूनही काही देशाला घातक अशी लोक सागरी किनाऱ्यावर काम करत असतात. त्यावर काही तोडगा काढत येईल का यावर काम करणार आहे. रोहिंग्या आणि बांग्लादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही. त्यांना सोडणार नाही. त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेऊ. समुद्र किनाऱ्यावर वसणाऱ्या बांग्लादेशींचा बंदोबस्त करणार.
नितेश राणेंना कांद्यांचा हार
सध्या देशभरात दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत कांदा उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत.त्यामुळे अनेक शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. अशातच काल (23 डिसेंबर) मंत्री नितेश राणे यांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका दर्शनाच्या कार्यक्रमात बोलत असताना एक वेगळच प्रकार घडला. नितेश राणे सभेला संबोधित करत असनाच अक शेतकरी मंचावर आला आणि त्याने नितेश राणेंना कांद्यांचा हार घातला. त्यावर नितेश राणेंनी त्या शेतकऱ्याला अडवू नका, त्याची समस्या ऐकून घेऊ, असे म्हटले. त्यानंतर शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला बोलू दिले आणि त्याला ताब्यात घेतले.
हेही वाचा: Nitesh Rane: नितेश राणेंना कांद्यांचा हार…; पोलिसांनी शेतकऱ्याला घेतलं ताब्यात
दरम्यान गेल्या आठवड्यात गुरुवारी (19 डिसेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवण्याची विनंती केली होती. त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांबाबत बोलले होते. पवार म्हणाले की, नवीन पीक आल्याने बाजारपेठेत कांद्याची आवक झाली आहे. शेतकऱ्यांना सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटल दराने आपला माल विकावा लागतो.
देशातील सर्वात मोठ्या घाऊक कांदा मार्केट लासलगाव नाशिक येथील कांद्याचे सरासरी दर महिन्याभरात 50 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत भाव 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असताना रविवारी (22 डिसेंबर) ते 2 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. नवीन खरीप पीक आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या प्रमुख कांदा उत्पादक भागात नवीन कांद्याची आवक वाढल्याने दर आणखी घसरतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.