
Politics over Mumbai ayor should marathi or hindu Nitesh Rane BMC Elections 2025 political news
भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय झाला पाहिजे असे वक्तव्य केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. कृपाशंकर सिंह म्हणाले की, “येत्या काळात मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय झाला पाहिजे. मुंबईच्या विकासामध्ये उत्तर भारतीयांचे मोठे योगदान आहे आणि त्यामुळे या समुदायाला मुंबईच्या सर्वोच्च पदावर प्रतिनिधित्व मिळायला हवे, असे कृपाशंकर सिंह यांनी म्हटले होते.
हे देखील वाचा : निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू
या विधानानंतर मुंबईचा महापौर हा कोणाचा होणार आणि मराठी होणार का यावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्याच्या वादानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. त्यांनी भाजपवर मुंबईतून मराठी अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप केला. याच वादात आता नितेश राणे यांनी उडी घेत ठाकरे गटाला सुनावले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. तसेच ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असल्याचे वक्तव्य केले होते.
हे देखील वाचा : तारिक रहमानच्या बांगलादेशातील प्रवेशामुळे जमात अडचणीत; पक्ष वाचवण्यासाठी वापरली ‘ही’ युक्ती
काय आहे राणेंचे ट्वीट?
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर पदावर भाष्य केले आहे. राणे यांनी लिहिले आहे की, जितकी मिर्ची ठाकरे गटाला.. उत्तर भारतीय महापौर ची लागली.. तकी मिर्ची बुरखे वाली महापौर बनेल ची का लागली नाही ? नी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते.. की.. बई चा महापौर हा..मराठी आणि हिंदूच होणार.आणि तो आमचाच होणार ! असा आक्रमक पवित्रा नितेश राणे यांनी घेतला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
जितकी मिर्ची ठाकरे गटाला.. उत्तर भारतीय महापौर ची लागली..
तितकी मिर्ची बुरखे वाली महापौर बनेल ची का लागली नाही ?
यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते..
बाकी..
मुंबई चा महापौर हा..
मराठी आणि हिंदूच होणार.
आणि तो आमचाच होणार ! मुंबई ❤️ महादेव 🚩 — Nitesh Rane (@NiteshNRane) January 1, 2026