Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महालक्ष्मी दर्शनासाठी निघालेल्या कारचा मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात; हैद्राबाद येथील दाम्पत्य…

गाडीने तीन ते चारवेळा पलटी मारल्याने महामार्गावरुन जाणार्‍या लोकांनी धावत येऊन त्या पती-पत्नींना बाहेर काढण्यास मदत केली. इंचगाव टोलनाका येथे कॉल करुन अ‍ॅब्ल्युलन्स व कर्मचारी बोलावून रोडच्या खाली गेलेली कार वर काढली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2025 | 12:07 PM
महालक्ष्मी दर्शनासाठी निघालेल्या कारचा मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात; हैद्राबाद येथील दाम्पत्य...

महालक्ष्मी दर्शनासाठी निघालेल्या कारचा मंगळवेढ्याजवळ भीषण अपघात; हैद्राबाद येथील दाम्पत्य...

Follow Us
Follow Us:

मंगळवेढा : सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर हैद्राबाद येथील एक कुटुंब महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कारमधून जात होते. त्याचदरम्यान, कारच्या आडवे कुत्रे आल्याने कारने तीन ते चारवेळा पलटी मारली. संबंधित कार ही रोडच्या खाली गेल्याची घटना घडली. हा अपघात सुगरण हॉटेलजवळ घडला. दरम्यान, या अपघातामध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालेले पती-पत्नी बालंबाल बचावले.

रवीकुमार दिनवही (वय 56) हे वित्त मंत्रालयात नोकरीस असून, सध्या ते हैद्राबाद येथे निवासी आहेत. 2 मे रोजी सकाळी 6.45 वाजता ते व त्यांच्या पत्नी जयश्री असे दोघेजण कार (टी.एस.08 एफ.डी.1818) या गाडीने कोल्हापूर येथील महालक्ष्मी दर्शनाच्या निमित्ताने जात होते. त्यावेळी सोलापूर-कोल्हापूर या राष्ट्रीय महामर्गावरील मंगळवेढाजवळ असलेल्या सुगरण हॉटेलजवळ रस्त्यावर एक कुत्रा अचानक आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार डाव्या बाजूस शेतामध्ये जाऊन पलटी झाली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, या गाडीने तीन ते चारवेळा पलटी मारल्याने महामार्गावरुन जाणार्‍या लोकांनी धावत येऊन त्या पती-पत्नींना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच इंचगाव टोलनाका येथे कॉल करुन अ‍ॅब्ल्युलन्स व कर्मचारी बोलावून रोडच्या खाली गेलेली कार वर काढण्यात आली.

दाम्पत्याला कोणतीही दुखापत नाही

कारने चार पलट्या मारुनही पती-पत्नी नशीबाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याने सदर कार चालकाने देवाचे आभार मानले. याची खबर कारचालकाने पोलिसांत दिली. या अपघाताचा अधिक तपास मंगळवेढा शहरचे पोलीस नाईक कृष्णा जाधव हे करत आहेत.

महिला मजुरांच्या वाहनाला अपघात

दुसऱ्या एका घटनेत, बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात बीड-अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात काही दिवसांपूर्वीच झाला होता.

Web Title: Car accident in mangalwedha car damaged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • Accident News
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
2

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
3

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
4

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.