Car, PMP bus and dumper accident on Pune Mumbai highway Vadgaon Maval News
वडगाव मावळ : पुणे मुंबई महामार्गावर अपघात झाला आहे. वडगाव मावळ जवळ झालेल्या या अपघातामुळे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातामध्ये एकजण जखमी झाला आहे. मातोश्री हॉस्पिटल जवळ आज, गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. पीएमपी बस (क्र. एमएच 14 एचयू 6293), डंपर (क्र. एमएच 14 एचजी 6677) आणि स्विप्ट कार (क्र. एमएच 12 एसई 9824) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये डंपर चालक जखमी झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, तिन्ही वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर असताना मातोश्री हॉस्पिटल जवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी स्विप्ट कार आणि तिच्या पाठीमागून येणारा डंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर स्विप्ट कार बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अपघातावेळी, डंपरमध्ये खडी असल्याने अवजड वाहन ब्रेक लावल्यानंर उलटले, यात डंपरमधील खडी रस्त्यावर सांडली व डंपरची ट्रॉली उलटून खाली पडली, यामुळे डंपरचेही मोठे नुकसान झाले, तर चालक जखमी झाला, त्याला तातडीने मातोश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर चौकात खडी सांडल्याने व अपघातग्रस्त वाहने रस्त्यात उभी राहिल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अगती वडगाव फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिरगाव पोलीस स्टेशन हद्दीत ७८ कि.मी. जवळ शेफाली ट्रॅव्हल्सची एक बस मंगळवारी (दि. 25) पहाटे पाचच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. कोल्हापूरहून मुंबईकडे जात असताना चालक वर्षिकेत प्रल्हाद बिराजदार यांचा बसवरील ताबा सुटला आणि बस हायवेच्या खाली उतरली. या दुर्घटनेनंतर बसला अचानक आग लागली. अपघातानंतर त्वरित बचावकार्य राबवण्यात आले आणि सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच वडगाव अग्निशमन दल, तळेगाव दाभाडे अग्निशमन दल आणि MSRDC पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. वाहतूक सुरळीत या अपघातामुळे काही काळ वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मात्र, यंत्रणांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत सुरू करण्यात आली. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी संबंधित घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.