पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचे सावट समोर दिसत आहे. आत्तापर्यंत या आजाराचे तब्बल 22 संशयित रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या दोन बड्या रुग्णालयांमध्ये आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाले आहेत. याची माहिती महानगरपालिकेलाही कळवण्यात आली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये या व्याधीशी संबंधित लक्षणं दिसून आल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातले असल्याचं सांगण्यात आले आहे. या दोन रुग्णालयांव्यतिरिक्त इतरही रुग्णालयांमध्ये काही संशयित रुग्णांना दाखल केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
8 रुग्ण व्हेंटिलेटरवर
गेल्या आठवड्याभरातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालेल्या १६ रुग्णांनी ही लक्षणं जाणवत असल्याचं सांगितलं. सहा लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण धायरी, सिंहगड रोड आणि किरकटवाडी परिसरातले होते. या १६ पैकी ८ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहितीही डॉ. जोग यांनी दिली आहे. दुसरीकडे पूना हॉस्पिटलमध्ये तीन रुग्ण दाखल झाल्याची माहिती रुग्णालयाचे कन्सल्टिंग इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अजित तांबोळकर यांनी दिली.
नियंत्रणासाठी पथक
संबंधित परिसरात परिस्थितीवर लक्षा ठेवण्यासाठी एक पथक पाठवण्यात येईल. असंही त्यांनी नमूद केलं आहे. सध्या आम्ही या भागातील एकूण सहा रुग्णांच्या रक्ताचे नमुन गोळा केले आहेत. हे सर्व नमुने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इर्नस्टट्युट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. वैशाली जाधव यांनी दिली आहे.
काय आहे आजार ?
गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दरवर्षी सुमारे एक लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. चेता संस्थेच्या चाचण्या, स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी, प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. 20 टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.