Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 17, 2026 | 11:40 AM
डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठात अमली पदार्थविरोधी युवा संवाद

डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठात अमली पदार्थविरोधी युवा संवाद

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात रविवारी काँग्रेस भवन परिसरात झालेल्या आंदोलनानंतर जोरदार राडा झाला होता. यात दगडफेकही झाली होती. भाजप विरुद्ध काँग्रेस कार्यकर्ते समोर येत एकमेकांना भिडले होते. या आंदोलनानंतर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढील काळात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पक्ष कार्यालयांसमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या घटनेत काँग्रेसचे तीन, तसेच भाजपचे दोन असे पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. दोन पोलीस कर्मचारी, दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केल्या. यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हे आदेश दिले आहेत.

यावेळी ते म्हणाले, ‘काँग्रेस भवन परिसरातील आंदोलन शांतपणे पार पडेल, असा अंदाज होता. घोषणाबाजी केली जाईल, अशी शक्यता होती. आंदोलनस्थळी पोलिसांनी बंदोबस्तही तैनात केला होता. मात्र, कार्यकर्त्यांची झटापट झाली. दगडफेक करण्यत आल्याची घटना घडली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, यापुढील काळात कोणताही पक्ष, संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही’.

पोलिसांसमोरच झाली होती दगडफेक

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार रविवारी घडला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवनावर दगडफेक केली, यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी आणि काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. काँग्रेस(Congress) कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोरच ही दगडफेक झाल्याचा आरोप केला आहे.

हेदेखील वाचा : Tipu Sultan Controversy: ‘हर्षवर्धन सपकाळ यांना तात्काळ अटक करा!” टिपू सुलतानशी तुलनेवरून हेमंत पाटील आक्रमक

Web Title: Protests in front of party offices will not be allowed in the future says pune police commissioner amitesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.