Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

काही अंतर गेल्यानंतर वाहक त्यांना चुकीच्या बसमध्ये बसल्याचे सांगतो आणि पुढील स्थानकावर उतरावे लागते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 17, 2026 | 02:35 AM
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
Follow Us
Close
Follow Us:

पीएमपीची पुणेकरांची लाईफलाइन अशी ओळख
रूट बोर्ड नसल्याने  प्रवाशांची गैरसोय
पीएमपीचेही  होतेय लाखो रुपयांचे नुकसान

चंद्रकांत कांबळे/ पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या बसवरील मार्ग दर्शविणारा डिजिटल रूट बोर्ड (मार्ग फलक) अनेक बसमध्ये बंद अवस्थेत आहे. तसेच मागील दरवाज्याजवळ लावला जाणारा साधा रूट बोर्डही बहुतेक वेळा लावलेला नसतो.त्यामुळे बस नेमकी कुठे जाणार आहे हे प्रवाशांना समजत नाही.परिणामी प्रवाशांचा (Pune News) वेळ वाया जात असून काही प्रवासी कंटाळून खाजगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाण्याबरोबरच ५०० रुपयांचा बोर्ड न लावल्यामुळे पीएमपीचेही लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

रूट बोर्ड नसल्यामुळे अनेक प्रवासी चुकीच्या बसमध्ये चढत आहेत. काही अंतर गेल्यानंतर वाहक त्यांना चुकीच्या बसमध्ये बसल्याचे सांगतो आणि पुढील स्थानकावर उतरावे लागते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून गोंधळलेल्या अवस्थेत बसमधून उतरावे लागत आहे.

PMP चा चेकरच्या माध्यमातून केवळ ‘कमाई’चा प्रयत्न? डोळ्यांना झापड लावून…; स्वच्छतेचा अभाव अन्…

५०० रुपयांचा बोर्ड न लावल्यामुळे लाखोंचे नुकसान

पीएमपीच्या अनेक बसवर सुमारे ५०० रुपयांचा रूट बोर्ड लावलेला नसल्यामुळे बसचा मार्ग स्पष्ट होत नाही.त्यामुळे नवीन प्रवासी काही वेळ स्थानकावर थांबल्यानंतर खाजगी बसकडे वळताना दिसतात.रूट बोर्ड नसणे हेच यामागील मुख्य कारण असून यामुळे पीएमपीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

डिजिटल फलक नसल्यामुळे राञीच्या वेळी मार्ग कळत नाही

पीएमपीचे डिजिटल फलक बहुतेक बसमध्ये बंद आहेत. यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी बसचा मार्ग समजत नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

चेकर चे पूर्ण दुर्लक्ष

या महत्त्वाच्या बाबीकडे चेकरांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. चेकरांचे मुख्य काम म्हणजे प्रवाशांची तिकिटे तपासणे, रूट बोर्ड व मार्गदर्शक फलकांची पाहणी करणे, वाहकांची अचानक रोकड तपासणी करणे, चालक कोणताही थांबा चुकवत नाही याची खात्री करणे, तसेच चालक मोबाईलवर बोलत वाहन चालवत नाही ना हे पाहणे. या सर्व कामांसाठी मुख्य चेकर १४५ आणि मदतनीस १७६ असे एकूण ३२१ चेकर नेमले आहेत. मात्र प्रत्यक्षात बहुतांश वेळा हे चेकर केवळ तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करताना दिसतात आणि इतर बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…

मला बालगंधर्व येथून दांडेकर पूल येथे जायचे होते,समोर काञज असे बसवर लिहलेले असल्यामुळे बसमध्ये बसलो परंतु कोणत्या मार्गाने बस जाणार आहे हे मागच्या बाजूला बोर्ड नसल्यामुळे मला कळालेच नाही.त्यामुळे माझा मार्ग चुकला वाहकांने मला साहित्य परिषद येथे सोडले.त्या ठिकाणाहून गांजवे चौक येथे चालत जावे लागले मग तिथून मी दांडेकर पूलची गाडी पकडली.

आकाश राठोड,पीएमपी प्रवासी

पीएमपीचा आढावा

एकूण बस – २,०४९

संचलनातील बस – १,७९५

एकूण मार्ग – ३८८

दैनंदिन फेऱ्या – २१,४४५

ज्या बसवर रूट बोर्ड (मार्ग फलक) लावलेले नाहीत, तिथे ते लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व बसवर डिजिटल आणि साधे फलक दिसतील.

— अ‍ॅलिस पोरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.

Web Title: Lack route boards pmp buses pune causes inconvenience to passengers and financial loss pmp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • PMPML Bus
  • pune news
  • Pune PMP Bus

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
3

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
4

Shrimant Dagdusheth Halwai मंदिराला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.