Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune- Bengaluru Express Way: प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे – बंगळुरू महामार्ग आता 8 पदरी होणार

एक्सप्रेसवेमुळे पुणे व बंगळूरू या दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर अंदाजे ९५ किलोमीटरने कमी होईल. सध्या, वाहतूक व्यवस्थेनुसार १५ तास लागू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 26, 2025 | 09:29 PM
Pune- Bengaluru Express Way: प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे - बंगळुरू महामार्ग आता 8 पदरी होणार

Pune- Bengaluru Express Way: प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे - बंगळुरू महामार्ग आता 8 पदरी होणार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुणे – बंगळुरू दरम्यानचा ८ पदरी द्रुतगती महामार्ग ५० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधला जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दोन्ही शहरांमध्ये सध्याचा प्रवास वेळ १५ तासांवरून फक्त ७ तासांवर येईल. मुंबई ते बंगळुरु प्रवासाचे अंतर सुध्दा त्यामुळे घटेल.७०० किमी लांबीचा हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विकसित केला जात आहे.  तो कर्नाटकातील नऊ जिल्हे व महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांशी जोडला जाईल.

पुणे-बंगळुरू एक्सप्रेस वे हा भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित केला जाईल आणि राष्ट्रीय महामार्ग एन एच-४८ च्या (जुना एन एच-४) तुलनेत हा एक पर्यायी आणि जलद मार्ग म्हणून काम करेल. उत्तरेकडील टोकावर, एक्सप्रेसवे ‘एमएसआरडीसी’च्या पुणे रिंग रोड प्रकल्पापासून तो सुरू होईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ‘एनएचआयआय’या महत्त्वाकांक्षी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करत आहे. नंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल.

हा द्रुतगती मार्ग कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमधून जाईल, ज्यात बेंगळुरू ग्रामीण, तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, विजयनगर, कोप्पल, गदग, बागलकोट आणि बेळगाव यांचा समावेश आहे . महाराष्ट्रात तो सांगली, सातारा आणि पुणे ग्रामीण‌ व शहर क्षेत्रात असेल.सुरळीत वाहतूकीसाठी हा एक्सप्रेस वे ८ पदरी महामार्ग म्हणून नियोजित आहे. बांधकामाचा अंदाजे खर्च ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या एक्सप्रेसवेमध्ये सहा रोड ओव्हर ब्रिज , २२ इंटरचेंज, ५५ फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी १४ क्रॉसिंग असतील. वाहनांना ताशी १२० किमी वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल.

हा एक्सप्रेस वे कर्नाटकातील अविकसित प्रदेश आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातून जाईल, ज्यामुळे रहिवाशांना चांगली्य कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराच्या संधींचा फायदा होईल. पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे जवळच्या भागातील निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये सुधारित कनेक्टिव्हिटी आणि संबंधित पायाभूत सुविधांसह परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज असेल.

एक्सप्रेसवेमुळे पुणे व बंगळूरू या दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर अंदाजे ९५ किलोमीटरने कमी होईल. सध्या, वाहतूक व्यवस्थेनुसार १५ तास लागू शकतात. ‘पुणे-बेंगळुरु  एक्सप्रेस वे’ साठी प्राथमिक काम सुरू असून तो २०२८ पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन आहे. या महामार्गावरील प्रदेशात आर्थिक विकासाला चालना अशी अपेक्षा आहे.

राज्यातील ३ जिल्ह्यातून जाणार

महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातील बोम्मनल (अथणी तालुका), बेळगावी जमखंडी, बागलकोट, बदामी, मुधोळ, नरगुंद, गदग (रॉन), येलाबुर्गा (कोप्पल), विजयनगरा (कुडलिगी), दावणगेरे (जगालुरू), मधुगिरी, चित्रदुर्ग तालुका, बंगळुरू, कोकुरुलम, चित्रदुर्ग तालुका, कोरमरांग, कोमलम (दोड्डबेल्लापूर) या गावातून हा प्रस्तावित महामार्ग जाईल.

Web Title: Central government build 8 lane pune bengaluru greenfield express way transport news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 09:29 PM

Topics:  

  • Bengaluru
  • highway news
  • Pune

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले
1

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
2

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
3

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.