मध्य रेल्वेचे मुंबई पुणे मेन लाईन वरील खंडाळा घाटात मालवाहू गाडी रुळावरून घसरली. या गाड्यांमुळे डाऊन मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्या यांना थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांचा खोळंबा झाला होता.सायंकाळी डाऊन मार्गावरील वाहतूक पुन्हा सुस्थितीत झाली आणि त्यानंतर त्या मेल एक्सप्रेस गाड्या पुन्हा मार्गस्थ झाल्या.मध्य रेल्वे पुणे मुंबई मार्गावर मंकी हिल ते कर्जत या भागात खंडाळा घाटात सकाळी डाऊन मार्गावर मालगाडी रुळावरून खाली घसरली.
या मालगाडीचे काही डब्बे रुळावरून खाली उतरल्याने त्या ठिकाणी मध्य रेल्वेचे मार्गावरील वाहतूक बंद पडली. मंकी हिल केबिन जवळ त्या मालगाडीचे डब्बे रुळावरून खाली उतरल्याने या भागातील वाहतूक थांबवण्यात आली. त्याचा परिणाम डाऊन मार्गावर असलेल्या गाड्या आहे त्याच ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या.
कर्जत कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मालगाडीचे काही डब्बे रुळावरून घसरल्याने मुंबई बंगळूर कोणार्क एक्सप्रेस वांगणी स्थानकात थांबवण्यात आली.तर जोधपूर हडपसर एक्सप्रेस ही गाडी कर्जत स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती.दुपार नंतर मालगाडीचे रूपावरून घसरलेले डब्बे पुन्हा सुस्थितीत आणण्यात आल्यानंतर मालगाडी पुण्याकडे रवाना झाली. या सगळ्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून नाहक त्रास सहन करावा लागला आहे.