प्रवाशांसाठी खुशखबर; होळीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय , या मार्गांवर धावणार ४८ विशेष ट्रेन
होळी सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे प्रवाशांसाठी मध्य रल्वेनेही मोठा निर्णय घेतला आहे. होळीनिमित्त प्रमुख मार्गांवर ४८ अतिरिक्त विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या ट्रेनचा उद्देश प्रवाशांसाठी आरामदायक आणि सुरळीत प्रवास प्रदान करणे आहे. या विशेष ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार ते जाणून घेऊया..
मुंबई – मऊ, दानापूर, बनारस, समस्तीपूर, कन्याकुमारी, तिरुअनंतपुरम
पुणे – गाजीपुर, दानापूर, हजरत निजामुद्दीन
या अतिरिक्त ट्रेन्सद्वारे होळी सणाच्या काळात प्रवाशांची सोय होईल, असा आशावाद आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापुर – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा)
01009 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १०.०३.२०२५, दि. १५.०३.२०२५ आणि दि.१७.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दुपारी १२:१५ वाजता सुटेल आणि दानापुर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
01010 द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. ११.०३.२०२५, दि. १६.०३.२०२५ आणि दि. १८.०३.२०२५ रोजी ०६:१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०४:४० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: एक द्वितीय वातानकूलित, एक द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानकूलित, ०६ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य श्रेणीसह – लगेज- गार्ड्स कोच (२२ कोच).
२) लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)
01123 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. ०७.०३.२०२५, दि. ०९.०३.२०२५, दि. १४.०३.२०२५ आणि दि. १६.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२:१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी रात्री ०८:२० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
01124 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. ०९.०३.२०२५, दि. ११.०३.२०२५, दि. १६.०३.२०२५ आणि दि. १८.०३.२०२५ रोजी मऊ येथून सकाळी ५.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी जंक्शन, जौनपूर जंक्शन आणि औंडिहार.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह-लगेज- गार्ड कोच (२२ कोच)
३) लोकमान्य टिळक टर्मिनस -बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (४ सेवा)
01053 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १२.०३.२०२५ दि. १३.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १२:१५ वाजता सुटेल आणि बनारस येथून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:०५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
01054 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन बनारस येथून दि. १३.०३.२०२५ आणि दि. १४.०३.२०२५ रोजी ०८:३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ४:४० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, पिपरिया,नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी आणि वाराणसी जंक्शन.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, ०६ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह -लगेज- कम गार्ड्स कोच (२२ कोच)
४) पुणे – दानापूर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (६ सेवा)
01481 पुणे – दानापूर ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १०.०३.२०२५, दि. १४.०३.२०२५ आणि दि. १७.०३.२०२५ रोजी पुणे येथून सायंकाळी ७:५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ५:०० वाजता पोहोचेल. (३ सेवा)
01482 दानापूर – पुणे ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १२.०३.२०२५, दि. १६.०३.२०२५ आणि दि. १९.०३.२०२५ रोजी दानापूर येथून सकाळी ६:४५ वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:३५ वाजता पोहोचेल. (३ सेवा)
थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित, ७ तूतीय वातानुकूलित , ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन (२२ कोच)
) पुणे – गाजीपुर शहर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या)
01431 पुणे – गाजीपुर शहर ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. ०७.०३.२०२५, दि. ११.०३.२०२५, दि. १४.०३.२०२५ आणि दि. १८.०३.२०२५ रोजी पुणे येथून सकाळी ६:४० वाजता सुटेल आणि गाजीपुर शहर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७:०५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)
01432 गाजीपुर शहर – पुणे ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन दि. ०९.०३.२०२५, दि. १३.०३.२०२५, दि. १६.०३.२०२५ आणि दि. २०.०३.२०२५ रोजी गाजीपुर शहर येथून पहाटे ४:२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:२० वाजता पोहोचेल. (४ सेवा)
थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहमदनगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, वाराणसी, जौनपूर Left औंरीहार जंक्शन.
संरचना: १ द्वितीय वातानुकूलित , ७ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन (२२ कोच)
६) लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
01043 ही साप्ताहिक विशेष ट्रेन मंगळवार दि. ११.०३.२०२५ आणि दि. १८.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १२:१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९:१५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01044 ही साप्ताहिक विशेष ट्रेन बुधवार दि. १२.०३.२०२५ आणि दि. १९.०३.२०२५ रोजी समस्तीपूर येथून रात्री ११:२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महल, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलिपुत्र जंक्शन, हाजीपूर आणि मुजफ्फरपुर.
संरचना: एक वातानुकूलित प्रथम श्रेणी, तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार, २ सामानासह ब्रेक व्हॅन. (२२ कोच)
७) पुणे – हजरत निजामुद्दीन – पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष (४ सेवा)
01491 साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन शुक्रवार दि. ०७.०३.२०२५ आणि दि. १४.०३.२०२५ रोजी पुणे येथून सायंकाळी ५:३० वाजता सुटेल आणि हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६:१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
01492 साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन शनिवारी दि. ०८.०३.२०२५ आणि दि. १५.०३.२०२५ रोजी हजरत निजामुद्दीन येथून रात्री १०:१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११:५५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, उधना जंक्शन, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, सवाई माधोपूर आणि मथुरा जंक्शन.
संरचना: ०१ द्वितीय वातानुकूलित, ०४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन (२२ कोच)
८) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कन्याकुमारी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष (४ सेवा)
01005 ही साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन सोमवार दि. १०.०३.२०२५ आणि दि. १७.०३.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १२:२० वाजता सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
01006 ही साप्ताहिक अतिजलद विशेष ट्रेन मंगळवार दि. ११.०३.२०२५ आणि दि. १८.०३.२०२५ रोजी कन्याकुमारी येथून दुपारी २:१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ४:१५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुरगि, वाडी, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनि, गुंटकल, गुत्ती, ताडिपत्री, यर्रगुंटला, कडपा, राजमपेट, रेणिगुंटा, तिरुत्ताणि, काटपाडी, वेल्लोर कॅन्टोन्मेंट, तिरुवण्णामलै, थिरुक्कोविल्लुर, विल्लुपुरम, वृद्धाचलम जंक्शन, अरियलूर, तिरुचिरापल्ली जंक्शन, दिंडुगुल जंक्शन, कूडल नगर, मदुरै जंक्शन, विरुदुनगर जंक्शन, सात्तूर, कोविलपट्टि, तिरुनेलवेली जंक्शन, वल्लियूर आणि नागरकोविल जंक्शन.
संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, ९ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामानासह ब्रेक व्हॅन. (२० कोच)
९) लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुअनंतपुरम उत्तर- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष – (४ सेवा)
01063 विशेष ट्रेन दर गुरुवारी दि. ०६.०३.२०२५ आणि दि. १३.०३.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि तिरुअनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
01064 विशेष ट्रेन तिरुअनंतपुरम उत्तर येथून दर शनिवारी दि. ०८.०३.२०२५ आणि दि. १५.०३.२०२५ रोजी सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी १२:४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकल, मूकांबिका रोड बैन्दूर, कुन्दापुरा, उडुपी, सुरतकल, ठोकुर, मंगलूरू जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कालीकत, तिरूर, शोरानूर, तृशुर, एरणाकुलम टाउन, कोट्टयम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्करा, कायमकुलम आणि कोल्लम.
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामानासह ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार. (२२ कोच)
आरक्षण: 01009/01010, 01123/01124, 01053/01054, 01481/01482, 01431/01432, 01043/01044, 01491/01492, 01005/01006, 01063/01064 या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ०१.०३.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.