Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेजुरीत जयघाेषात चंपाषष्ठी उत्सव सुरु ; सहा दिवस धार्मिक कार्यक्रम,  मंदिराला आकर्षक सजावट

तीर्थक्षेत्र जेजुरीत चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होत आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत बालदारीत करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

  • By Aparna
Updated On: Dec 13, 2023 | 10:03 PM
जेजुरीत जयघाेषात चंपाषष्ठी उत्सव सुरु ; सहा दिवस धार्मिक कार्यक्रम,  मंदिराला आकर्षक सजावट
Follow Us
Close
Follow Us:

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होत आहे. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि भंडार खोबऱ्याच्या उधळणीत बालदारीत करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

उत्सवाचा प्रारंभ करताना बुधवारी पहाटेच मुख्य मंदिरात पाकाळणी करण्यात आली. मार्तंड भैरव मूर्तीला दही, दूध व तेलाने स्नान घालण्यात आले. सभोवताली गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मिरवणुकीने मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिणेनंतर बालदारीत उत्सव मूर्तींना आणण्यात आले. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तीची स्थापना करून समोरच दुपारी १२:३० वाजता शंकराचार्य श्रीनृसिंह भारती यांच्या हस्ते घट बसवण्यात आले. यावेळी वेदमूर्ती पुरोहित शशिकांत सेवेकरी, मंगेश खाडे गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात व सनई चौघड्याच्या सुरेल वादनात देवांची महाआरती, भंडार खोबऱ्याची उधळण तसेच पुष्पवृष्टीही करण्यात आली. देवाचे मानकरी, पुजारी सेवक वर्गाकडून उत्सवमूर्तींना सुवर्ण व चांदीचे दागिने चढविण्यात आले.

मार्तंड देवसंस्थान, जयमल्हार चंपाषष्टी प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गाभाऱ्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. यावेळी मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडे, अभिजित देवकाते, तसेच सेवेकरी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, बाळासाहेब दिडभाई, देवल बारभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे आदींनी सहभाग घेतला होता. उत्सवाचे नियोजन देवाचे सेवेकरी, पुजारी मानकरी मंडळाकडून करण्यात आले आहे.

तेव्हापासून साजरा हाेताेय विजयाेत्सव

पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धरण करून चंपाषष्टीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसात खंडोबा गडावर विजयोत्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणूनही साजरा केला जातो.

Web Title: Champashashti festival begins in jejuri six days of religious events attractive decoration of the temple nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2023 | 10:02 PM

Topics:  

  • jejuri
  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune

संबंधित बातम्या

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती
1

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर
2

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.