
पुणे: गेला महिनाभर सुरू असलेल्या पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या हॉस्टेल संदर्भातील व्यवहार रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त यांनी आज ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दिला. ‘हा मुद्दा जैन समाज आणि संबंधित विकसक यांच्यातील असून या प्रकरणात जैन समाजाच्या भावनांना न्याय दिला जाईल,’ अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
या विषयात पुण्याचे खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि माझे मित्र मुरलीधर मोहोळ यांचे नाव विनाकारण ओढले गेले. भारतीय जनता पक्षाची दिवसागणिक वाढत असलेली ताकद हा अनेक नतद्रष्टांसाठी असूयेचा विषय आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. निवडणूक जवळ आली की या प्रयत्नांना जोर येतो. मुरलीधर मोहोळ यांच्या बदनामीचा प्रयत्न हा या असूयेचाच भाग होता. या प्रकरणात आरोपांची राळ उठवणाऱ्यांच्या पूर्वइतिहासावर नजर टाकली तर त्यांची पत काय आहे, हे सूज्ञ पुणेकरांना सहज समजू शकेल.
धंगेकरांची मोहोळांवर मात; Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांनी दिला ‘हा’ महत्वाचा आदेश