पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचा व्यवहार रद्द (फोटो- सोशल मीडिया)
पुणे जैन बोर्डिंग हाऊस व्यवहार रद्द
धर्मादाय आयुक्तांनी दिला आदेश
गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द करण्याची केली होती मागणी
Pune News: गेले काही दिवस पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या व्यवहारावरून जैन समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून पुण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. दरम्यान या प्रकरणात आता धर्मादाय आयुक्तांनी मोठा निर्णय दिला आहे.
धर्मादाय आयुक्तांनी गोखले बिल्डर्स आणि पुणे जैन बोर्डिंग हाऊस यांच्यामधील व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता हा व्यवहार रद्द झाला आहे. काही दिवसांपूर्वी गोखले बिल्डर्सने ईमेल करत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली होती.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन प्रकरणावरून पुण्यातील राजकारण तापले होते. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्याला मोहोळ यांनी प्रत्युत्तर देखील दिले. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट देखल घेतली होती.






