'शिवसेनेत ज्यांना किंमत नाही त्यांनी राजेंवर बोलू नये, यापुढे बोलाल तर याद राखा'; चंद्रकांत वेंदे यांचा अंकुश कदम यांना इशारा
जावळीत काहीतरी निमित्त शोधून अंकुश कदम तुमची ‘पोपटपंची’ सुरू आहे. राजकीय स्वार्थाने तुम्ही प्रेरित आहात. जावळीची जनता मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी जावळीचा जो विकास साधला आहे. त्यावर जनतेचा विश्वास आहे व राजेंवर जनतेचे प्रेम देखील आहे. त्यामुळे आपली जावळीतील ‘पोपटपंची’ आता थांबवा, अन्यथा जनता तुम्हाला जावळीत फिरू देणार नाही. गेली तीन टर्म शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीचा विकासात्मक कायापालट केला आहे. आज अनेक युवकांना जिल्हा बँकेसह इतर माध्यमातून रोजगार देण्याचे त्यांनी काम केले आहे. आपण नेमकं आतापर्यंत काय केलं याचं आत्मपरीक्षण करा.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपल्याला कुसूंबी गटातील एकाही सोसायटीचा ठराव घेता आला नाही. आणि आपण तालुक्याच्या राजकारणाच्या गप्पा मारत आहात.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करत असेल तर त्याला ते कधीही पाठीशी घालत नाहीत. उलट अशा प्रवृत्तीला बाजूला करण्याची त्यांची आजपर्यंत भूमिका आहे. मात्र, काही लोक स्वतःचे वैयक्तिक आणि व्यावसायिक वाद राजकीय रंगात रंगून इतकी पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे ओळखण्या इतपत जावळीची जनता नक्कीच सुज्ञ आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन जावळीतील जनतेला एकीकडे भावनिक करायचं. मात्र, एकनाथ शिंदे हे महायुतीतील घटक आहेत आणि आपण घटक पक्षांमध्ये वाद वाढवण्याचा जो कुटील प्रयत्न करत आहात तो थांबवा. अन्यथा आपल्याच पक्षश्रेष्ठींकडून आपली हकालपट्टी होईल.
कदम आपण मराठा आरक्षण मोर्चादरम्यान कशा पद्धतीने मराठा समाजाची कुचेष्टा केली. हे सर्व आम्हाला काढण्यास लावू नये. यापुढे आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंवर बोलाल तर याद राखा असा सज्जड इशारा चंदू वेंदे यांनी दिला. ज्या आतिष कदमांचे समर्थन तुम्ही करण्यासाठी काल मेढ्यात जो निषेध मोर्चा काढलात तेच अतिश कदम नेमके शिवसेनेचेच पंचायत समिती सदस्य आहेत का? हे पहिले तपासा. उगाच काहीतरी निमित्त काढून स्टंटबाजी करायची हा जावळीतील जनतेला आपला दुर्गुण माहित आहे. त्यामुळे आपण पहिली आपली शिवसेना तपासून घ्या, कोण शिवसेनेसोबत आहे, कोण शिवसेना सोबत नाहीत आणि मग जावळीच्या विकासाच्या गप्पा मारा, असा उपरोधिका टोला वेंदे यांनी कदम यांना लगावला.
1. चंद्रकांत वेंदे यांनी कोणाला इशारा दिला?
श्रीमंत छत्रपती बाबाराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत (चंदु) वेंदे यांनी अंकुश कदम यांना इशारा दिला.
2. वेंदे यांनी अंकुश कदम यांच्यावर काय आरोप केला?
छत्रपती संभाजीराजेंनी स्वराज्य पक्षातून विधानसभेची उमेदवारी देऊन कदम यांना राजकारणात संधी दिली. त्यानंतर त्यांनी संभाजीराजेंशी गद्दारी करून शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप वेंदे यांनी केला.
3. शिवेंद्रसिंहराजेंबाबत वेंदे यांनी काय म्हटले?
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर अंकुश कदम यांनी बोलू नये, असे सांगत यापुढे त्यांच्याबाबत वक्तव्य केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा वेंदे यांनी दिला.






