Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानापूर्वी चिराट फोडण्याची परंपरा महाराष्ट्रातील काही भागांत पाहायला मिळते. चिराट फोडल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या बियांबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता असते. या बियांचा नेमका उपयोग काय केला जातो? त्या जपून ठेवतात की फेकून देतात? जाणून घेऊया या परंपरेमागील समजुती आणि महत्त्व
नरक चतुर्दशीला चिराट फोडल्यानंतर त्यातील बियांच काय करतात?

नरक चतुर्दशीला कडू चवीचे कारिट अर्थात चिराट पायाच्या अंगठ्याने फोडले जाते. त्यानंतर त्याच्या आतील बिया बाहेर काढल्या जातात.

महाराष्ट्रातील काही कुटुंबांमध्ये चिराट फोडल्यानंतर त्यातील दोन बिया डोक्याला लावल्या जातात. ही एक पारंपरिक धार्मिक प्रथा मानली जाते.

चिराट हे नरकासुराचे प्रतीक मानले जाते. ते फोडणे म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय, अशी धार्मिक समजूत आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान, उटणे आणि कारिट फोडण्याचे विधी केले जातात. या परंपरांना धार्मिक महत्त्व आहे.

चिराटाच्या कडूपणानंतर गोडधोड खाण्याची परंपराही काही ठिकाणी आहे. आयुष्यातील कटू अनुभवांनंतर आनंदाचे दिवस यावेत, असा यामागील प्रतीकात्मक अर्थ सांगितला जातो.






